সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 14, 2017

रामटेक येथिल जैविक कचरा वीज निर्मीती प्रकल्प बंद


नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाचे  तीन-तेरा ;प्रकल्प चालविण्याकरीता निधी आणण्यात रामटेक नगर पालिका अपयशी 

रामटेक तालुका प्रतिनिधी-
नागपूर जिल्हयात रामटेक नगर परिषदे  अंतर्गत वर्ष  2013 मध्ये जैविक कच-यापासून वीज निर्मीती प्रकल्प उभारण्यात आले होते. तत्कालीन सत्ताधारी कमेटीने  आपल्या अथक प्रयत्नाने 14 वे वित्त आयोगातुन निधी आणून उपरोक्त प्रकल्प नागपूर जिल्हयात पहिलाच  प्रकल्प उभारला  होता. उपरोक्त प्रकल्पातून रामटेक शहरातील रस्त्यावरील 16 र्लाइटला विद्युत पुरवठा केला   होता

रामटेक नगर परिषदे अंतर्गत असलेले उपरोक्त  वीज निर्मीती प्रकल्पाचे काम अवंती एंटरप्रायजेस ला चालविण्याकरीता देण्यात आले  होता. परंतु कंत्राटदाराचे  बील न निघाल्यामुळे रामटेक नगर परिशदेत भाजपची सत्ता आल्या पासून पहिल्याच वर्षी  उपरोक्त प्रकल्प मागील 12 दिवसांपासून ताळेबंद करण्यात आले आहे . त्यामुळे उपरोक्त  प्रकल्पावर चालणारे रस्त्यावरील लाईट देखिल बंद असून  परिसर अंधारात आहे. 
14 वे वित्त आयोगाकडून मंजुरी  मिळविण्यात व निधी खेचून  आणण्यात नगर पालिकेला  आलेले आहे . त्यामुळे  उपरोक्त प्रकल्प बंद केले असल्याचे कंत्राटदाराने सांगितले . तसेच रामटेक शहरातील घनकचरा व्यवस्थापनासह अनेक  विकास कामे रखडलेली आहेत   . यामुळे  रामटेकातील नागरीक त्रस्त झालेले असून  न.प. प्रशासन  व पदाधिका-यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे .अनेक नियमबाहय व मनमानी ठराव करण्याचा सपाटाही विद्यमान सत्ताधारी करीत असल्याचा  पक्षनेते सुमीत कोठारी यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकातून केला आहे  उपरोक्त बाबतीत नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना विचारले असता
त्यांनी संबधित कंत्राटदाराने  काम बंद केल्याने  आठवडाभरापासुन हा प्रकल्प बंदअवस्थेत  असल्याचे  सांगितले .एकदोन  दिवसात हा प्रकल्प  सुरू करण्याचा शासनाचा  मानस असल्याचेही त्यांनी  स्पष्ट केले 

नुकताच नगरपालीका प्रशाकीय  ईमारत बांधकामाबाबत केलेला ठराव मा.जिल्हाधिकारी यांनी रद्द केला व नियमानुसार  संबधित कंत्राटदाराला काम देण्याचे  आदेश  नगरपालीका प्रशासनाला दिले आहेत.एकूणच नगरपालीकेतील विद्यमान सत्ताधारी पक्षावर यामुळे नामुश्कीची वेळ आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.