সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 14, 2017

स्टेट बॅंकेच्या ईमारत जप्तीची कार्यवाही

 १४ लक्ष रूपये करवसुलीसाठी रामटेक नगरपालीका करणार
रामटेकच्या स्टेट बॅंकेच्या ईमारत जप्तीची कार्यवाही
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक नगरपालीकेचे रामटेक येथील स्टेट बॅंकेची शाखा असलेल्या ईमारतीवर 14 लक्ष 7 हजार 656 रूपये मालमत्ताकर बकाया असल्याने या ईमारतीला जप्त करण्याची कारवाई रामटेक नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी आरंभ केली असून तशी नोटीस या ईमारतीचे मालक उमाकांत तुकाराम मर्जिवे यांना बजावण्यात आली असल्याचे व ही ईमारत जप्त करण्याची कार्यवाही कुठल्याही क्षणी होणार असल्याचे प्यारेवाले यांनी नोटीसीत स्पष्ट केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,रामटेकच्या नेहरू चौकालगत अत्यंत
मोक्याच्या जागी उमाकांत मर्जिवे यांची टोलेजंग ईमारत आहे.ही ईमारत त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या रामटेक शाखेला अनेक वर्षांपासून  किरायाने दिली आहे.मात्र या ईमारतीचा मालमत्ताकर रामटेक नगरपालीकेकडे भरणा केला नसल्याने ही जप्तीची कारवाई करणार असल्याचे नगरपालीका प्रशासनाने कळविले आहे. याबाबत रामटेक नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की,सदर ईमारतीचा मालमत्तकराचा भरणा दिनांक 1एप्रिल 2006 पासुन करण्यांत आलेला नाही.31 मार्च 2017 अखेर मालमत्ताकराची एकूण थकबाकी 14 लक्ष 7 हजार 656 रूपये आहे.दिनांक 8डिसेंबर रोजी या ईमारतीचे मालक यांना तीन दिवसांत उपरोक्त रक्कम नगरपालीकेच्या कार्यालयांत भरणा करावी अन्यथा सदर
ईमारत जप्तीची कारवाई करण्याचे सुचित करण्यांत आले होते.परंतु मालमत्ताधारक यांनी थकीत कराचा भरणा केला नाही व वारंवार नोटीस देवूनही त्याची दखल घेतली नसल्याने या मालमत्तेवर जप्ती वॉरंट निघालेला आहे.
सदर जप्तीची नोटीस 13 डिसेंबर 2017 रोजी उमाकांत मर्जिवे यांना बजाावण्यात आली असुन याबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या रामटेक षाखेचे व्यवस्थापक व विभागीय प्रबंधक यांना दोन दिवसांत बॅंकेचे शाखा कार्यालय अन्यत्र हलविण्याची सुचना देण्यात आली आहे.विहीत मुदतीत अशी  व्यवस्था न केल्यास नगरपालीकेच्या जप्ती कारवाईमुळे कुठलेही नुकसानीस नगरपालीका जबाबदार राहणार नसल्याचेही कळविण्यांत आले आहे.
उपरोक्त पत्राची प्रत नागपुरचे जिल्हाधिकारी,रामटेकचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व रामटेक पोलीस निरीक्षक यांना देण्यांत आल्या आहेत.जप्तीच्या या पार्ष्वभूमीवर कराचा भरणा केला जातो की नगरपालीका
जप्तीची कारवाई करते की आणखी काही? याकडे रामटेकवासीयांचे लक्ष लागले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.