रामटेक तालुका प्रतिनिधी-

रामटेक नगर परिषदे अंतर्गत असलेले उपरोक्त वीज निर्मीती प्रकल्पाचे काम अवंती एंटरप्रायजेस ला चालविण्याकरीता देण्यात आले होता. परंतु कंत्राटदाराचे बील न निघाल्यामुळे रामटेक नगर परिशदेत भाजपची सत्ता आल्या पासून पहिल्याच वर्षी उपरोक्त प्रकल्प मागील 12 दिवसांपासून ताळेबंद करण्यात आले आहे . त्यामुळे उपरोक्त प्रकल्पावर चालणारे रस्त्यावरील लाईट देखिल बंद असून परिसर अंधारात आहे.
14 वे वित्त आयोगाकडून मंजुरी मिळविण्यात व निधी खेचून आणण्यात नगर पालिकेला आलेले आहे . त्यामुळे उपरोक्त प्रकल्प बंद केले असल्याचे कंत्राटदाराने सांगितले . तसेच रामटेक शहरातील घनकचरा व्यवस्थापनासह अनेक विकास कामे रखडलेली आहेत . यामुळे रामटेकातील नागरीक त्रस्त झालेले असून न.प. प्रशासन व पदाधिका-यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे .अनेक नियमबाहय व मनमानी ठराव करण्याचा सपाटाही विद्यमान सत्ताधारी करीत असल्याचा पक्षनेते सुमीत कोठारी यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकातून केला आहे उपरोक्त बाबतीत नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना विचारले असता
त्यांनी संबधित कंत्राटदाराने काम बंद केल्याने आठवडाभरापासुन हा प्रकल्प बंदअवस्थेत असल्याचे सांगितले .एकदोन दिवसात हा प्रकल्प सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले