नागपूर/प्रतिनिधी:
धंतोली येथील काही भागात भूमिगत वाहिन्यांचे अत्यावश्यक काम करायचे असल्याने उद्या दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी दोन तास काही भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ७. ३० ते ९. ३० या वेळेत अमर ज्योती पॅलेस, लोकमत चौक परिसर, विजयानंद सोसायटी, यशवंत स्टेडियम परिसर, रामदासपेठ कॅनाल रोड, श्रीराम भवन परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज बंद राहणार असल्याचा संदेश महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना देण्यात येणार आहे.