সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 05, 2018

४ वर्षांनंतर उघडले सुकन्या योजनेचे पाहिले खाते

बँक ऑफ इंडिया बाजारगाव चा निष्काळजीपणा

 प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली येथे तक्रार केल्यानंतर आली बँकेला जाग



बाजारगाव/ प्रतिनिधी/गजेंद्र डोंगरे

ज्या परिवारात मुली जन्म घेतात अश्या कुटूंबास यांच्या मुलीचे शिक्षण, लग्न व स्वयंभू व्हावी या दृष्टिकोनातून अर्थ मंत्रालयातर्फे २ डिसेंम्बर २०१४ रोजी ही योजना सम्पूर्ण भारतात सुरू करण्यात आली या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता त्यासाठी मुलीच्या पालकांना शासकीय बँक ,डाक घर येथे व्यवस्था करण्यात आली. या योजनेतून उघडल्या गेलेल्या मुलीच्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेच्या दुप्पट ती मुलगी साधण्यान झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये सुकन्या मदत निधी म्हणून शशना कडूनही निधी त्या मुलीच्या खात्यात जमा केले जाते .त्यामुळे महिलांच्या सब्लिकरणास याचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे परंतु गेल्या चार वर्षांत अनेक कुटूंबास (मुलीच्या पालकास) बँकेची पायपीट करावी लागते व आम्हाला या योजनेची कसलीही माहिती नाही असा त्रास देण्याच्या घटना अनेक बँकेत सुरू आहे 


अशीच घटना बाजारगाव येथील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत उघडकीस आली शिवा सावनगा येथील तुषार कोहळे हे आपल्या एक वर्षाच्या असणाऱ्या मुलीचे खाते उघडण्याकरिता ४ ऑगस्ट २०१८ ला बाजारगाव येथील शाखेत गेले असता आमच्या शाखेतून सुकन्या योजनेत पैसा जमा होत नसल्याचे कारण सांगून ग्राहकांची दिशा भूल करण्यात आली परंतु मुलीचे वडील सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी लगेच प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली येथे याची तक्रार करताच अवघ्या १५ मिनिटाच्या आत बँक ऑफ इंडिया तील म्यानेजर बी.आर.भालेराव यांना ईमेल द्वारे माहिती देण्यात आली व घडलेल्या प्रकारचा खुलासा सुद्धा मागण्यात आला व त्वरित त्या मुलीचे खाते उघडण्यात यावे असा मेल येताच बँकेतील कर्मचाऱ्याची मुलीच्या वडीलास शोधण्यास धावपळ सुरू झाली तुम्ही आमच्या बँकेत या व खाते खोलून देतो असे त्यांना सांगण्यात आले खाते खोलून त्यांच्या मुलीच्या उघडण्यात आलेल्या सुकन्या योजनेचे पुस्तक आम्ही घरी आणून देतो असे सांगण्यात आले

सदर प्रकार सुशिक्षित पालक असल्यामुळे ४ वर्षानंतर उघडकीस आला अन्यथा एकाही मुलीचे सुकन्या योजनेचे खाते बँक ऑफ इंडिया बाजारगाव शाखेने उघडले नसते हे दिसून येते

बाजारगाव या परिसरातील कुटुंब अजूनही या योजनेपासून दूर आहे व त्यांना या योजनेची माहिती बँक देत नाही अशी माहिती परिसरातील लोकांनी दिली आहे तसेच बँक खाते खोलण्यासाठी सुद्धा १५ ते २० दिवस बँकेचे चक्कर घालावे लागते त्यानंतर बँकेत खाते खोलून मिळते तसेच बाजारगाव परिसरात अनेक कम्पन्या असून सर्वच कर्मचाऱ्याचा पगार हा बँकेतून होतो त्यामुळे बँकेत नेहमी गर्दी असते या गर्दी मुळे सामान्य नागरिकांना सुद्धा पैसे टाकण्यास व काढण्यास तासन तास लाईन मध्ये उभे राहावे लागते

बँकेतील कर्मचारी हे नागरिकांना सेवा देण्यासाठी असतात परंतु कर्मचारी काही जरी विचारणा केली तर माहीत नाही हेच उत्तर देतो तर म्यानेजर हा सामान्य नागरिकाला जवळ उभा पण करत नाही त्यामुळे म्यानेजर बी. आर. भालेराव याची चौकशी करण्याची मागणी परिसरातील लोकांनी केली आहे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.