चंद्रपूर/प्रतिनिधी:
अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरणी आता वेगळेच वळण लागणार आहे.या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपी महाराष्ट्राबाहेर फरार झाल्याची माहिती आहे.अशोक अग्रवाल स्वामी फ्युएल कंपनीत "अकाउंटंट' म्हणून कार्यरत होता,त्याच्यावर कंपनीतील पैशांचा अपहार केल्याचा आरोपावरून छळ सुरु होता.यातच त्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार तो बघायचा.मिळालेल्या माहितीनुसार अशोकच्या आत्महत्येचे आरोपी म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात होते असे सर्व आरोपी महाराष्ट्राबाहेर फरार झाल्याची माहिती आहे.याच्या शोधकार्यासाठी पोलिसांनी ३ पोलीस पथके राज्याच्या विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.या प्रकरणी आज शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होती मात्र ती ठोस पुरावे नसल्याने सुनावणी होवू शकली नाही. त्यामुळे हि सुनावणी समोर ढकलत ४ ऑगस्टला होणार असल्याची शक्यता आहे.
रामनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संदीप अग्रवाल,रणजितसिंग छाबडा,नितीन उपरे,ओमप्रकाश अग्रवाल यांचेवर गुन्हे दाखल केले होते.पोलीस आरोपींच्या शोधात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पोहचे परियंत ते फरार झाले होते.भद्रावती येथील कर्नाटक एम्प्टाच्या बंद खाणीतील कोट्यवधी रुपयांचा कोळसा खासगी वीज कंपन्यांना विकण्यात आला. या अनधिकृत व्यवहाराचा लेखाजोगा अशोक अग्रवाल याच्याकडे होता. यातील एका व्यवहारातील चार कोटी रुपयांचा ताळेबंद जुळत नव्हता. ती रक्कम अशोक अग्रवाल याने उडविली, या संशयावरून त्याचा छळ सुरू झाला. हा जाच सहन झाला नाही. त्यामुळे अशोकने आत्महत्या केली, असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.अशोक अग्रवालने आत्महत्येपूर्वी लिहिलेली "सुसाईड नोट' समाज माध्यमांवर फिरत आहे. परंतु, याची अधिकृत प्रत अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नाही.