चंद्रपूर/प्रतिनिधी:
आगामी बकरी ईद आणि गणेश उत्सव निमित्त्याने पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे जिल्हा शांतता समिती तसेच जिल्हयातील मुस्लिम समाजबांधव, मौलाना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दि. 20/08/2018 रोजी डिंल शेड पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे आयोजीत करण्यात आली होती.
सदर कार्यकम्रास अध्यक्ष म्हणुन श्री. कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्याचप्रमाणे श्रीमती अंजली घोटेकर महापौर चंद्रपूर मनपा, श्री. शेंडे, सहायक धर्मदाय आयुक्त, श्री. महेश्वर रेड्डी , पोलीस अधीक्षक चंद्रपुर, सहायक मनपा आयुक्त श्री. बेहरे, श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. सुशीलकुमार नायक उप विभागिय पोलीस अधीकारी चंद्रपूर शहर, एसडीपीओ. श्री. विलास यामावार, एसडीपीओ. श्री. प्रशांत परदेशी, एसडीपीओ. श्री. विशाल हिरे, एसडीपीओ. श्री.
शेखर देशमुख, तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य व जिल्हयातील गणेश मंडळाचे पदाधीकारी तसेच सदस्य उपस्थितीत होते. सदर कार्यकम्रामध्ये आगामी बकरी ईद आणि गणेश उत्सवासंबंधाने मार्ग दर्शन करण्यात आले.
गणेश सभामंडपाच्या रोषणाई करीता लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वायरची जुळणी ही अतीशय थातरु मातुर स्वरूपात केलेली असतात तेव्हा ही इलेक्ट्रिक वायरची जुळणी अपघात होउ नये या दृश्टीणे योग्य प्रकारे मंडळाच्या सदस्यांनी करून घ्यावी तसचे आय. एसआय. मार्क असलेले विदयुत उपकरणे वापरावे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा आणि पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी मोलाचे मार्ग दर्शन सदर बैठकिस केले. आगामी बकरी ईद आणि गणेश उत्स्वव हा कश्याप्रकारे मंगलमय शांततेत आणि सौदार्हपुर्ण वातावरणात साजरा होईल यावर त्यांनी आपले भरीव मार्ग दर्शन सर्व मंडळानां केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमणार, यांनी मंडळांना आपले मंडळ नोंदणीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणल्या जाईल या बाबत आष्वस्त केले. सोबतच मंडळांनी आपले देखावे सकारात्मक ठेवुन गोळा होणार्या निधीतुन सार्वजनीक उपक्रम राबविण्याकरीता प्राधान्य दयावे असे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी आणि श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवीत मंडळांनी हा उत्सव साजरा करावा तसेच ध्वनी प्रदुषणच्या बाबतीत मा. उच्च न्यायालयाने दिलेेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन गणेश मंडळानी कोणत्याही परीस्थितीत कायदयाचे व सामिजिक स्वास्थाचे उल्लंघन होणार नाही याची विषेश खबरदारी घ्यावी असा संदेश पोलीस अधीक्षक
यांनी दिला. सदर कार्यकम्राचे प्रास्ताविक अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांनी केले असनु कार्यकम्राचे संचलन पाे नि. श्री. जयवंत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा शांतता समिती सदंस्यांसोबतच मोठया संख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी, जिल्हा शांतता समिती सदस्य, ईकाे-प्राे संस्था पदाधिकारी सदस्य, वाल्मीकी मच्छीमार संस्था सदस्य उपस्थित होते.