चंद्रपुर/प्रतिनिधी:
शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस गोडावून हे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देताना दिसत आहे, ज्यावेळेस हे गॅस गोडावून सुरु झाले असतील त्यावेळेस त्याठिकाणी हा निवासी भाग नसेल पण आता शहर चारही बाजूने विस्तारलेले आहे व हे गॅस गोडावून आता शहराच्या मध्यभागी आहे हे बघता याभागात केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते व लवकरात लवकर दुर्घटनेला निमंत्रण देणारे गॅस गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे या मागणीच निवेदन जिल्हाधिकारी खेमणार याना देण्यात आले.
रामनगर, गंजवार्ड , आणि टिळक मैदानात असलेलं गॅस गोडावून हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे कधी तर मध्येच गाड्या थांबवून नागरिकांना सिलेंडरचे वितरण नियम धाब्यावर ठेवून करीत असतात.
टिळक मैदानात असलेल्या गोडावून च्या बाजूला मिठाई चे दुकान आहे त्याठिकाणी रोज स्टोव्हच्या माध्यमातून नवनवीन पकवान काढण्याचं काम सुरु असते हे सर्व सुरु असताना एक ठिणगीच मोठ्या दुर्घटने साठी पुरेशी आहे हि बाब प्रशासनाने लक्षात घ्यायला हवी, प्रशासनाने वेळोवेळी जाऊन नियमांच पालन होत आहे का तपासायला हवे पण तस काही होत नाही, कारण शहरात नियम धाब्यावर बसवूनच सर्व कामे सुरु आहेत हि बाब जिल्हाधिकारी खेमणार यांना लक्षात आणून दिली त्यांनी सर्व बाबी समजून त्वरित याच्यावर तोडगा काढून गॅस गोडावून शहराबाहेर हलविण्यासंदर्भात प्रक्रिया करू असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी खेमणार यांना या मागणीचे निवेदन देण्याकरिता शिष्टमंडळात मनसे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, भरत गुप्ता , मनोज तांबेकर आदी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.