महावितरण चंद्रपूर विभाग चंद्रपूर द्वारा कस्तुरबा रोड वरील स्थानिक कोलते रॊड ते गिरनार चौक परिसरपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात जनतेनी सहकार्य करावे.
महावितरण चंद्रपूर विभाग चंद्रपूर द्वारा कस्तुरबा रोड वरील स्थानिक कोलते हॉस्पिटल ते गिरनार चौक या अतिशय वर्दळीच्या परंतु अरुंद रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होण्यासाठी उपरी वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकात्मिक वीज सुधारणा कार्यक्रम IPDS अंतर्गत हे काम करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची रीतसर परवानगी व रोड रेइन्स्टेटमेन्ट शुल्क, रोड cutting शुल्क भरण्याच्या परवानगीसह सदर काम सुरु करण्यात आले आहे. सदर कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथडा निर्माण होत असला तरी जनतेच्या हिताचे हे कार्यक्रम असून त्यांनाच उपरी वाहिन्यांपासून व रस्त्यावरील वीजखांबापासून सुटका मिळणार आहे. हे काम त्वरित करण्यात येत आहे . महावितरण ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे. तरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण द्वारा करण्यात येत आहे. तसेच सादर कामात पेव्हर ब्लॉक सोडून त्यापासून थोडे थोडे अंतर सोडून रस्त्याचे बाजूने काम करण्यात येत आहे. पेव्हर ब्लॉकच्या खालील भागात BSNL ची केबल व महावितरण ची भूमिगत वीज वाहिनी गेली असून त्यांना धक्का लागू नये यासाठी पेव्हर ब्लॉक सोडून रस्त्याचे कडेने हि भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येत आहे. तरी जनतेच्या हिताच्या या कार्यात जनतेने महावितरण व महानगरपालिका यांना सहकार्य करावे असेल आवाहन महावितरण द्वारा करण्यात य्येत आहे.