সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, August 15, 2018

कोलामगुड्यावर ध्वजारोहणानंतर धरणे

चंद्रपूर/प्रतिनिधी
 जिवती तालुक्यातील खडकी या दुर्लक्षीत कोलामगुड्यावर ध्वजारोहण
करण्यात आले. माणिकगड पहाडावरील हे गाव इंग्रज राजसत्तेपासून आजतागायत ग्रामपंचायतीचे ठिकाण आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतेक ही एकमेव ग्रामपंचायत असावी जीथे ग्रामपंचायतीचे कार्यालय नसावे. याचे कारण केवळ तीन किलोमीटर लांबीचा रस्ता. गेल्या 72 वर्षात या गुड्याला रस्ता मिळाला नाही म्हणून कधीकाळी सातशे घरांची असलेली ही वस्ती आता सोळा घरांची राहीली आहे. अतीशय खरतड जीवन जगणा-या या कोलामगुड्यावर विकासाची गंगा पोहोचलीच नाही.
अशा या उपेक्षित कोलामगुड्यावर जैतू पाटील कोडापे यांनी ध्वजारोहण केले. यानंतर कोलाम गुड्यावरील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेत्रुत्वात धरणे देण्यात आले.
दुपारी एक वाजता शेतकरी नेते अँड. वामनराव चटप यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी सुपरीचित साहित्यिक, कवी प्रा. वाकुडकर यांनी 'आता तरी उगवेल का कोलामगुड्यावर स्वातंत्र्याचा सुर्य' या विषयावर मार्गदर्शन केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.