महानिर्मितीच्या निधीतून ११ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
२ कोटींच्या खसाळा भूमिगत नाल्याद्वारे मलनिसा:रण योजनेचे उद्घाटन
कोराडी,पांजरा,खापरी,खसाळा,नांदा गावांमध्ये चौफेर विकास
जगण्याचे स्वातंत्र्य हुतात्म्यांमुळे मिळाले, त्याची आठवण म्हणून हा स्वातंत्र्य दिन आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे, जगभरात भारतीय विद्यार्थ्याना संधी आहे, घेतलेले शिक्षण मांडता आले पाहिजे, सादर करता येणे गरजेचे आहे. जगात भारताला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. २१ व्या शतकात सुसंस्कृत समाज, संस्कारित पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते महानिर्मितीच्या निधीतून पुनर्वसित गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी कोराडी येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर सभागृहात बोलत होते.
भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर,खोबे, देवराव डाखोळे,संजय मैंद, विठ्ठल निमोने, सरपंच रवींद्र पारधी, उपसरपंच सुनिता वैरागडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कंभाले, सरपंच सुनिता चिंचूरकर, उप सरपंच उमेश निमोने,पंचायत समिती सदस्या केशरताई बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना मैंद,अर्चना दिवाणे,नरेंद्र धानोले,कल्पना कामटकर,निर्मला मोरई,रवींद्र मोहनकर,देवेंद्र सावरकर,राजकुमार शिवणकर,हेमराज चौधरी,जितेंद्र बानाईत,श्रावणी वाघमारे,बेबी खुबेले,कैलास सोमेश्वर, सोनाली वानखेडे,वंदना रामटेके, मुख्य अभियंते अनंत देवतारे, राजकुमार तासकर, अभय हरणे, राजेश पाटील, उप मुख्य अभियंता राजेश कराडे, कार्यकारी अभियंता शिरीष वाठ, खसाळा ग्रामपंचायत सदस्य मुकेश इंगोले, अश्विन गभने, अमोल वाघमारे, देवेंद्र टेकाम, छाया सावरकर, छबी रोकडे, अरुणा तभाणे, मीना चौधरी, सरपंच तसेच उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य खसाळा,पांजरा,खापरी,नांदा आणि कोराडी प्रामुख्याने उपस्थित होते.
मातीशी नाळ, समाजाप्रती बांधिलकी, जन्मदात्याप्रती आदर व निसर्गाचे ऋण फेडण्याची भावना अंगी असायला हवी, प्रत्येकाने किमान चार झाडे लावून,जगविण्याचा संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी केले. आगामी काळात कोराडी येथे अत्याधुनिक इंडोअर स्टेडियम, अद्ययावत व्यायामशाळा,मंदिर परिसर विकास, कोराडी पर्यटन, तलाव सुशोभिकरण, विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास कामे, अंतर्गत रस्ते, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रारंभी १० वी,१२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
महानिर्मितीच्या खसाळा, पांजरा, खापरी, नांदा कोराडी या पुनर्वसित गावांमध्ये सुमारे १३.३० कोटींच्या विविध सोयी सुविधा कामांचे भूमिपूजन व उद्घाटन नामदार चंद्रशेखर बावनकुळे उर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपूर यांचे शुभहस्ते करण्यात आले. महानिमितीच्या व राज्य वीज नियामक आयोगाच्या रीतसर मंजुरीनंतर सुमारे ११.१८ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन तर महापारेषणच्या निधीतून खसाळा येथे २.१० कोटी रुपयांचे भूमिगत नाल्याद्वारे मलनि:सारण योजनेच्या कामाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर करण्यात आले.
खसाळा गावामध्ये जिल्हा परिषद शाळा स्वच्छतागृह, क्रीडांगण, बगीचा, बौद्धविहार स्तूप व संरक्षण भिंत बांधकाम, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, पथदिवे, हायमास्ट लाईट व नाली बांधकामाचा समावेश आहे.
पांजरा गावामध्ये अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण-सिमेंटीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत १.५० लक्ष लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईटच्या कामांचा समावेश आहे.
नांदा गावामध्ये हनुमान मंदिर संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत १.५० लक्ष लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईट व बाजार ओटा बांधकामाचा समावेश आहे.
कोराडी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय अतिरिक्त मजला, सुगत वाचनालय अतिरिक्त बांधकाम,तेजस्विनी विद्यालय पेवमेंट,शेड,स्वच्छतागृह, सिद्धार्थनगर मैदान व गुरांच्या दवाखान्याजवळ संरक्षण भिंत,प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राजवळ मैदान, अंतर्गत रस्ते सशक्तीकरण-डांबरीकरण, शाळा मैदान संरक्षण भिंत, ५० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी, पथदिवे, हायमास्ट लाईट, वक्रतुंड प्रिंटर जवळील नाला सिमेंटीकरण कामांचा समावेश आहे.
खसाळा २.११ कोटी, पांजरा १.५३ कोटी, खापरी १.७३ कोटी, नांदा २.१६ कोटी, कोराडी ३.६५ कोटी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन बंडू शंभरकर, विठ्ठल निमोने आणि उत्तम झेलगोंदे यांनी केले. कार्यक्रमाला खसाळा, पांजरा, खापरी, नांदा, कोराडी परिसरातील नागरिक महिला-पुरुष-मुले-मुली संबंधित भूमिपूजन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.