देशाचे पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच देहवसान झाले असून भारतमातेच्या या महान सुपूत्रास श्रध्दांजली वाहण्यासाठी दि. 23 आॅगस्ट 2018 रोजी सायं. 7 वाजता सर्वपक्षिय श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होत असलेल्या या सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे पूर्व अर्थराज्यमंत्राी शांतारामजी पोटदुखे राहणार असून या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर, चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्राी सुधीर मुनगंटीवार, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पूर्व खासदार नरेश पुगलीया, राज्य वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजूराचे आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, पूर्व नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार, रिपाईचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम, रिपाई (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, मनसे नेते, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार आदी प्रभृतींची याप्रसंगी उपस्थिती लाभणार आहे.
या सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमास राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच विविध समाजातील बुध्दीजीवी व नागरिकानी बहुसंख्येने उपस्थित राहून देशाच्या पूर्व प्रधानमंत्राी तथा महान विभुतींच्या स्मरणार्थ आपली श्रध्दांजली अर्पित करावी असे आवाहन आ. नानाजी शामकुळे व चंद्रपुरच्या महापौर अंजली घोटेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून केले आहे.