সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, August 06, 2018

चंद्रपुरात नगरसेवक अन नागरिकांवर आली प्लंबरगिरीची वेळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले.त्यामुळे प्रशासनाच्या मुजोरकि पणामुळे नागरिकांना आणि नगरसेवकावर चक्क प्लंबरगिरीची वेळ आली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना दत्तनगर परिसरातील नागरिकांनी फोन करून मागिल अनेक महिन्यांपासून दत्तनगरमध्ये पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी सांगितले. तेव्हा नगरसेवक पप्पु देशमुख व नागरिकांनी नागपूर मार्गावरील अंजीकर शोरूम जवळील पुलाखाली असलेला लिकेज शोधून काढला. याबाबत नागरिकांनी उज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. रविवार दिवस असल्यामुळे तांत्रिक कामगार सुद्धा त्वरित येणार नाहीत, याची कल्पना नागरिकांना आली.
त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख व प्रभागातील नागरिक दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे, केशव दारवणकर, महेंद्र राळे, गुलाबराव पुनवटकर, विश्वनाथ नक्षिणे, खेमराज चिवडे त्यांनी स्वत:च लिकेज दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे यांनी आपल्याकडील पाईप दुरूस्तीचे साहित्य आणले. सर्वजण नाल्यात उतरले आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले.
अशाप्रकारे नागरिकांनी व नगरसेवकाने स्वत: पुढाकार घेऊन लिकेज बंद केला. लिकेजमुळे विनाकारण पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतरही उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते महेंद्र राळे यांनी केला आहे. शहर अजून पाणीटंचाईच्या धोक्यातून सावरलेला नसताना अशा समस्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मनपा व पाणी पुरवठा कंपनीच्या कारभारावर प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात असून पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनपा करत आहे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
शहरात अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दत्तनगर व वडगाव प्रभागातील अनेक ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होतो. नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या लेखी तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देण्यात आल्या. आमसभेमध्येही हा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. परंतु, मनपा प्रशासन पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीविरूद्ध कठोर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहे. विवेकानंदनगर, लक्ष्मीनगर, पीडब्ल्यूडी कॉर्टर, दत्तनगर, सिव्हील लाईन परिसरातील नागरिकांकडून अनेकवेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मनपा याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. आतातरी पालिकेने पाणी समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.