कुपोषित बालकांना भूमीपुत्राकडून पोषणआहार वाटप
चंद्रपूर जिल्ह्यातील कुपोषित बालकांची खुप संख्या आहे पण त्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करून कुपोषित बालकांना योग्य आहार पोहचावा हि संकल्पना घेऊन डाँ सपना बच्चूवार या क्षेत्रात कार्य करीत आहे. ही संकल्पना भूमीपुत्राचे सामाजिक कार्यकर्ते मा श्री विनोद गोवरदीपे सर , नीतेश खामनकर ,निलेश पाऊणकर यांना डाँ सपना बच्चूवार यांनी सांगितली त्यांनी अथक परिश्रम घेऊन कुपोषित बालकांना एकदिवसीय आहार मिळावा यासाठी विनोद गोवरदीपे, नीतेश खामनकर, निलेश पाऊणकर यांनी व भूमीपुत्राचे सर्व सदस्यांनी यात आर्थिक मदत केली व हा स्तुत्य उपक्रम घडवून आणला. या कार्यक्रमात बाल रोग तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी व मल्टी व्हिटॅमिन टॉनिक बाटल्या वाटप करण्यात आल्या.
दि. १४/०८/२०१८ रोज घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात उद्घाटक: डाॅ. राहुल भोंगळे, बाल रोग तज्ञ, जि.सा.रू.
अध्यक्ष: श्री . संजय झोल्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण, चंद्रपुर प्रमुख पाहुणे: श्री. प्रकाश भादंकर, सि.डि.पी.ओ. चंद्रपुर प्रमुख अतिथी मा श्री उमाकांत धांडे ,डाँ सोनाली कपूर, डाँ.यशोधन वाडेकर, डाँ सपना बच्चूवार गोवरदीपे सर नीतेश खामनकर या कार्यक्रमात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्र-संचालन केतन जुनघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद जी उरकुडे सरांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मोलाचा वाटा असणारे भूमीपुत्राचे सहकारी मित्र मा. श्री संतोष ताजणे , विनोद गोवरदीपे, लक्ष्मीकांत धानोरकर, महेश गुंजेकर ,महेश खंगार,रोशन आस्वले, प्रवीण सोमलकर, प्रणय काकडे , निलेश पाऊणकर, आशीष ताजणे, अतुल जेणेकर, केतन जुनघरे, प्रमोद उरकुडे,मनोहर डवरे, सूर्यकांत डवरे, नीतेश खामनकर, दीक्षांत बेले, प्रिया नांदे , कीर्ती केशट्टीवार व इतर मित्रांनी सहकार्य केले.