भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे घराचे छत कोसळले
भंडारा - अतिवृष्टीमुळे घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना राजेदहे गावात घडली. यात मृत पावलेल्या ३ वर्षीय मुलीचा मंगळवारी जन्मदिवस होता. जन्मदिवशीची मृत्यूदिवस असा दुःखद योगायोग या चिमुरडीच्या नशिबात आला आहे. भंडारा तालुक्यातील जवाहरनगरजवळ असलेल्या राजेदहे गावात शेतमजूर सुखरू खंडाते हे आपली पत्नी आणि मुलीसह घेऊन नारायण ढोबळे यांच्या घरी भाड्याने राहत होते. सोमवारी सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर पत्नीसोबत मुलीच्या वाढदिवसाच्या तयारीची चर्चा करुन ते झोपी गेले. मात्र, काळाला काही वेगळेच अभिप्रेत होते. ज्या घरी मुलीच्या वाढदिवसाची तयारी होणार होती. त्याच मुलीचा मृतदेह नातेवाईकांनी ढिगाऱ्यातून काढला.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण घरातला नेमका सुखरू राहत असलेला भागातील छत पहाटे चारच्या दरम्यान कोसळली. यात सुखरू खंडाते (वय ३२ वर्ष), त्यांची पत्नी सारिका खंडाते (वय २८ वर्ष) आणि त्यांची मुलगी सुकन्या खंडाते (वय ३ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावातील लोकांनी याची माहिती प्रशासनाला दिली. गावकरी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरू आणि त्यांच्या परिवाराला ढिगाऱ्या खालून काढण्यात आले. त्यांचे मृतदेह शविच्छेदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. एकाच परिवारातील विशेषतः ३ वर्षीच्या सुकन्याचा वाढदिवशीच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.