जिल्हयातील बेरोजगार अभियंता नोंदणीसाठी(REGISTRATION ) दिनांक 27 आॅगस्टला मेळावा
चंद्रपूर दिनांक 21 आॅगस्ट 2018 महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यामधील बेरोजगार विद्युत अभियंत्यांना कामे देण्याच्या राज्य षासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली व महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरेाली या दोन जिल्हयातील 114 बेरोजगार विद्युत अभियंत्यांना काम मिळण्यासाठी मेळावे घेण्यात येत 6 कोटी 66 लाखाची कामे कामे देण्यात आली.
आतापर्यंत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत, चंद्रपूर मंडलातील 64 बेरोजगार अभियंत्यांना 2 कोटी 29 लाखाची कामे देण्यात आली आहेत तर गडचिरोली मंडलातील 50 बेरोजगार बेरोजगार अभियंत्यांना 4 कोटी 37 लाखाची कामे देण्यात आली आहे. या अभियंत्यांनी महावितरणची साथ देत दुर्गम अशा गावातही वीज पोहोचविण्याचे काम केले आहे.
बेरोजगार विद्युत अभियंत्यंाना या महावितरणच्या लघूदाब व उच्चदाब वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीचे काम, मीटर बदलविण्याचे, वीजपुरवठा व वीजयंत्रणा देखभालीचे काम तर गडचिरेालीसारख्या दुर्गम जिल्हयातील गावे विदयुतिकरणाचेही काम देण्यात आले आहे. बेरेाजगार अभियंत्यांना कामे मिळण्यासाठी पदवी किंवा पदविकाधारक असने आवश्यक असून, जिल्हा रोजगार व स्वंय रोजगार मार्गदर्शन केंद्रात नाव नोंदणीसह अदयावत विदयुत ठेकेदार अनुज्ञाप्ति प्रमाणपत्र व विदयुत पर्यवेक्षक क्षमता प्रमाणपत्र आवश्यक चंद्रपूर जिल्हयातील बेरोजगार अभियंत्यांना भविष्यात कामे मिळणे साईचे होण्यासाठी त्याकरीता त्यांना अधिक माहिती व नोेंदणीसाठी(REGISTRATION) दिनांक 27 आॅगस्ट सोमवार रोजी बाबुपेठ रोड स्थित चंद्रपूर मंडळ कार्यालयात सकाळी 11 वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मंडल कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संपर्क साधावा व बेरोजगार विद्युत अभियंत्यंानी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.