সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 14, 2018

खापरीच्या गावकरी व विद्यार्थ्यांनी मागणीसाठी अडविली बस

कारंजा (घा.)/उमेश तिवारी
कारंजा घाडगे दि १४ ऑगस्ट कारंजा तालुक्यातील खापरी गावात बस नेण्यात यावी या रास्त मागणीसाठी खापरीच्या गावकरी व विद्यार्थ्यांनी बस अडविण्याची घटना आज मंगळवारी १४ ऑगष्टला दुपारी १२ वांजताचे दरम्यान घडली.कारंजा बसस्थानक प्रमुख शिरपुरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकरी विद्यार्थ्यांची समस्या ऐकून घेतली.माणिकवाडा ते कारंजा रस्त्यावर सावरडोह पासून सहा किलोमीटरवर तुंबडीवाल्यांचे गाव म्हणून ओळख असलेले खापरी हे खेडेगाव आहे.खापरी येथील दहा ते बारा मुलेमुली  कारंजा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज सकाळी येतात व दुपारी १२  वाजेनंतर महाविद्यालय सुटल्यानंतर खापरीला परत जातात.सकाळी खापरी ते सावरडोह पर्यंत सहा किलोमीटर आठ नऊ मुली व काही मुले पहाटेच्या धुक्यात उपाशीपोटी पायदळच येतात व दुपारी  बाराचे दरम्यान कारंजावरून सावरडोह पर्यंत बसने येऊन पुन्हा सहा किलोमीटर उपाशीपोटीच खापरीला जातात. खापरी येथे  पुढे बस जात नसल्याने त्यांना पासेस सुध्दा सावरडोह ते कारंजा व कारंजा ते सावरडोह पर्यंतच काढाव्या लागतात.कधीकधी कामधंदा सोडून पालक सावरडोह पर्यंत पहाटेलाच पोहचऊन देण्यासाठी धावपळ करीत असतात.विद्यार्थ्यांना खापरी पर्यंत सुखरूप पोहोचता यावे म्हणून सकाळची माणिकवाडा ते कारंजा व दुपारची कारंजा ते साहूर बस खापरी गावापर्यंत नेण्यात यावी व विद्यार्थ्यांची उपाशी पोटी होणारी गैरसोय टाळण्यात यावी या मागणीसाठी आज बस  अडविण्यात आली.परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेण्यात यावीअशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.