मूल/प्रतिनिधी:
येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बसगाड्या अनियमित सुटत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी या मार्गावरचे विद्यार्थी सकाळी ७.३० वाजतापर्यंत मूलला पोहचतील, तर दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता व बुधवारी ३ वाजता मूलवरून नियमित बसगाड्या सोडाव्या. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच पास संपल्याचे सबब देत विद्यार्थ्यांची पास बंद करण्यात येत असल्याने पासची मुद्दत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
परिवहन मंडळाच्या अधिकाºयांनी सर्व मार्गावर बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक एस. व्ही. डफळे, वाहतूक अधीक्षक ए. बी. बोबडे, वाहतूक निरीक्षक एच. बी. गोवर्धन, वाहतूक निरीक्षक एस. सी. मेघावत, मूलचे वाहतूक नियंत्रक एन. डी. पठाण यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, अमित राऊत, गौरव श्यामकुळे, अमर कड्याम, रवि शेरकी, शहनाज बेग, विशान नर्मलवार, संगिता गेडाम उपस्थित होते.