वर्धा/प्रतिनिधी:
आपल्या कारंजा नगरीतील युवकांना या जागतिक स्पर्धेचा युगात शारीरिक सूदृष्ट्या जोपसन्याकरीता व्यायाम शाळेची अत्यंत आवश्यकता आहे.
पाणलोट समिती अंतर्गत ग्रामपंचायत ला सन २०१४ ला व्यायाम शाळेचे साहित्य प्राप्त झालेले आहे तरी जागे अभावी व ईमारत नसल्यामुळे ते साहित्य निरोपयोगी ठरत आहे.
ही बाब लक्षात घेता या स्पर्धेच्या युगात शारीरिक सुदृष्ट्या व्यायाम शाळेकरीता नगर पंचायत कडून ईमारत बांधकामाबाबत मा.मुख्याधिकारी न. पं.कारंजा (घा.)यांच्याकडे युवकांनी निवेदन सादर केले.