সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 12, 2018

चिमुरात शहीद स्मृतिदिन सोहळा १६ ऑगस्टला

चिमूर : भारतीय स्वातंत्रलढ्यात १६ ऑगस्ट १९४२ च्या चिमूरक्रांतीचे अमूल्य योगदान आहे. या अविस्मरणीय क्रांतीला यावर्षी ७६ वर्ष पूर्ण होत असून, चिमूर क्रांतीलढ्यातील वीर अमर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी १६ आगस्टला चिमुरात दरवर्षी शहीद स्मृतिदिन सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही या सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य व केंद्र सरकारचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. .

यावेळी चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन चिमूर व भिसीच्या नविन इमारती व वसाहतीचे लोकार्पण यासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
स्थानिक बीपीएड मैदानावर आयोजित शहीद स्मृतिदिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास व वनेराज्यमंत्री राजे अम्बरीशराव आत्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार मितेश भांगडिया, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह आजी-माजी आमदार व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून तयारीचा आढावा
स्थानिक बीपीएड मैदानावर शहीद स्मृतिदिन सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून, शनिवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आढावा घेतला. कार्यक्रमासंबंधाने आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्याकडून त्यांनी अधिकची माहिती जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, उपविभागीय अधिकारी संजय नागटिळक, महसूल, पोलीस व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसह वसंत वारजूकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्याम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, बकाराम मालोदे, होमदेव मेश्राम, एकनाथ थुटे, समीर राचलवर, पं. स. सदस्य अजहर शेख, नगरसेवक संजय खाटीक, संजय कुंभारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


९ ऑगष्ट १९४२ ला महात्मा गांधीजींनी दिलेली 'चले जाव... भारत छोडो...' आंदोलनाची हाक मुंबईपासून चिमूरसारख्या गावखेड्यात पोहोचली व येथे सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीने स्वातंत्र्याचे स्पुलिंग चेतविले. राष्ट्रसंतांच्या राष्ट्रभक्तीच्या भजनातून प्रेरित होऊन चिमुरातील तरुण ब्रिटीश सतेविरुद्ध पेटून उठला. इंग्रजांना सळो की पळो करून सर्कल इंस्पेक्टर जरासंध व डुगाजीचा वध करून चिमूरचा अवघ्या १६ वर्षाचा तरुण बालाजी रायपूरकर प्रथम शहीद झाला. या स्वातंत्र्यलढ्यात चिमूर हे १६, १७, १८ ऑगस्ट १९४२ ला भारतात सर्वप्रथम स्वतंत्र झाल्याची घोषणा खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडीओवरून केली होती. .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.