रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 58 (1) मधील तरतूदीनुसार दिनांक 16 जुलै 2018 रोजी जाहिर केलेल्या अधिसुचनेत 16200 किं.ग्र.वजनापेक्षा जास्त माल वाहून नेण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील मालवाहून नेणा-या वाहनांना 16200 कि.ग्रॅ.भारक्षमतेपेक्षा जास्त (जीव्हीडब्ल्यु) भारक्षमता वाढवून देण्यात येणार आहे. तेव्हा नमूद केल्यानुसार वाढीव जिव्हीडब्ल्यु साठी मोटार वाहन कराचा फरक (एक रकमी कर लागू असल्यास त्यासह) वसूल करण्यात येईल आणि कराचा फरक सदर अधिसूचना अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 6 ऑगस्ट 2018 पासून व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. याची नोंद सर्व वाहन धारकांनी घ्यावी.
तसेच वाहन धारकांना त्यांच्या वाहनांत जिव्हीडब्ल्यू मध्ये वाढ करुन पाहिजे असल्यास अशा वाहन मालकांनी या कार्यालयात को-या कागदावर वाढीव मागणीचा अर्ज सादर करावा. या वाढीव बदलाचे विहित केलेले शुल्क भरल्यानंतर वाढीव जिव्हीडब्ल्यू ची नोंद त्यांच्या प्रमाणपत्र व परवान्यामध्ये घेण्यात येवून आवश्यक शुल्क संबंधीताकडून स्विकारुन दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र व परवाना देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्हि.एज.शिंदे यांनी कळविले आहे.