ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी
तालुक्यातील सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांचे अज्ञात
चोरट्यांनी कुलूप तोडून साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ ऑगस्टच्या रात्री हि घटना घडली. या आधीसुद्धा १३ ऑगस्टच्या रात्री अरहेर-नवरगाव येथील जिल्हा परिषद
शाळेचे कुलुप तोडून दोन आलमाऱ्या फोडल्याची घटना घडली होती.हि घटना ताजी असतानाच पुन्हा
घडलेल्या या घटनांमुळे चोरट्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे
वळविल्याचे समजते.
मिळालेल्या माहिती
नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद
शाळांमध्ये २२ ऑगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. ह्या दोन्ही घटना
एकाच रात्री घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यातील सुरबोडी शाळेमधून
चोरट्यांनी मॉनिटर व प्रोजेक्टर असे अंदाजे ३५,००० हजार रुपये किंमतीचे
साहित्य चोरले तर दुसऱ्या घटनेत नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळेमधून
एम्प्लिफायर,माईक,पेनड्राईव्ह व सिपी असे साहित्य चोरीला गेले.याबाबत
दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.