वर्धा/प्रतिनिधी:
तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी वर्धा व श्रीगुरूदेव सेवा मंडळ सावळी खुर्द च्या संयुक्त विद्यमाने सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सरपंच बेबी विलासराव कडवे, प्रार्थना अध्यक्ष, विष्णूजी कडवे, अमोल घागरे युवा कार्यकर्ते आणि बेबीताई धंडाळे अध्यक्ष महीला बचत गट प्रमुख मार्गदर्शक म्हणून तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी वर्धा चे अध्यक्ष गजानन ढोबाळे व ह.भ.प. प्रशांत दादा मानमोडे, श्रीगुरूदेव प्रचारक गुरूकुंज मोझरी उपस्थित होते.
यावेळी अधिष्ठानाचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. मार्गदर्शनातून गजानन ढोबाळे यांनी रक्षाबंधन सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व सांगितले सोबतच संस्थेच्या ऐज्युफ्रेंड प्रकल्पाविषयी माहीती दिली. ह.भ.प. प्रशांत दादा मानमोडे यांनी समुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व विशद केले , ग्रामगीतेच्या महिलोन्नती अध्यायावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळ सावळी खुर्द च्या कार्यकर्त्यांनी श्रम घेतले.
सुत्रसंचालन श्रीगुरूदेव सेवा मंडळ चे सचिव श्री महेश पेंधे तर आभार अरूण खवसे यांनी केले.