केंद्रीय वीजबिलिंग पध्दतीनेे मिळणार ग्राहकांना वीजबिल भरण्यास अधिक कालावधी
अधिक्षक अभियंता श्री.अशोक म्हस्के यांनी साधला ग्राहकांशी संवाद
चंद्रपूरविभागातील बाबुपेठ शाखा कार्यालयांतर्गत भिवापूर वार्डातील समय मेडीकल स्टोअर्स व नरेश टभेडर्स या ग्राहकंाना चंद्रपूर मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक म्हस्के यांनी स्वतः भेट देत केंद्रीय वीजबिल पध्दती अंतर्गत छापण्यात आलेले प्रथम वीजबिल प्रदान केले व त्यंाच्याषी संवाद साधला. समय मेडीकल्सचे श्री. लक्ष्मन छन्नम यांनी नवीन वीजबिल पध्दतीबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अविनाष कुरेकार व उपकार्यकारी अभियंता श्री. वसंत हेडाऊ, शाखा अभियंता श्री. अमोल पिंपळे हे उपस्थित होते.
ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळावे तसेच ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा याकरिता महावितरणच्या वतीने वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीयस्तरावर करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. देशातील वीजवितरण क्षेत्रात अशा पध्दतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढहोईल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येणार आहे..
महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यन्त पोहोचण्यासाठी साधारणपणे सात ते आठ दिवसांचा अवधी लागत असे तो आत कमी होणार आहे तर वीजदेयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळणार आहे. ग्राहकांना वेळेत वीजबील न मिळाल्यामुळे त्वरीत देयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.
या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्या वतीने केंद्रीय पध्दतीने वीजबिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रिडिंगअॅपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम)मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पध्दतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वीजदेयक मिळेल तसेच त्यांना वीजदेयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे वीजदेयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील वदेयक भरणे अधिक सोयीचे होईल.
मुख्यालयातील सर्वरवर बील तयार करण्यात येणार असून हे बील परिमंडलस्तरावर वीजबील वितरणासाठी नियुक्त करण्यात येणार्या एजन्सीकडे 24 तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदर वीजबील शहरी भागात 48 तासात आणि ग्रामीण भागात 72 तासांत वितरीत करण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबील न देणार्या एजन्सींना दंड आकरण्यात येईल.
या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकी तसेच वाणिज्यिक हानीत घट, उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलींग,छपाई व वितरण खर्चात मोठी बचत, संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीयस्तरावरून नियंत्रण, बिलींग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संनियंत्रण इत्यादी लाभ होणार असून त्या सर्वांचा फायदा ग्राहकांना होईल