मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांनापूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. आलापल्ली-जिमलगट्टा मार्गावरील नंदीगावजवळच्या जिमेला नाल्यावर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
आलापल्लीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला नंदीगावनजीकचा नालाही ओसंडून वाहत होता,सोमवारी गडचिरोली आगारातून गडचिरोली आगाराची एमएच १४- बीटी ५०६५ क्रमांकाची एशियाड हिरकणी ही बस हैदराबादला गेली होती. आज सकाळी हैदराबाद येथून निघालेली ही बस सिरोंचामार्गे गडचिरोलीकडे येण्यास निघाली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नंदीगाव येथील नाल्याच्या काठावर बस पोहचली. त्यावेळी पुलावर पाणी नव्हते. मात्र, नाल्यावरुन बस पार करीत असताना सुरुवातीलाच एका खड्ड्यात बसचे चाक अडकले. चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु बस पुढे जात नव्हती एवढ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला. त्यामुळे चालक व वाहकाने प्रसंगावधान गावकर्यांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले .नंदीगावच्या लोकांनी धावपळ करुन लांब दोरखंड आणि ट्रॅक्टरची व्यवस्था केली. यावेळी दोन्ही काठांवर नागरिक उभे होते. काही वाहनेही थांबली होती. नागरिकांनी प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र, अचानक प्रवाह वाढल्याने बस पुरात वाहून गेली. समोर झाड असल्याने हि बस या झाडाला अडकली. बसमध्ये तब्बल २५ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.दोन दिवसानंतर या अडकलेल्या बस चा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा प्रकार सर्वांसमोर आला.