नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणकडून पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या रोहित्रांची चाचणी घेऊन सुरु करायची असल्यामुळे मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट २०१८ रोजी शहरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत एकात्मता नगर,दादाजी नगर,ऑर्बिटल एम्पायर, राधेश्याम नगर,भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, मनीष ले आऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर,जयबद्रीनाथ सोसायटी, जयताळा,दुबे ले आऊट, दाते ले आऊट, शारदा नगर, घरकुल सोसायटी, प्रगती नगर, चिंच भवन, वैशाली नगर, राय उद्योग, राजाराम नगर, बहुजन बस्ती, वैनगंगा कॉलनी, चुना भट्टी, जेल परिसर, अजनी चौक, माऊंट कॅरामल सहल परिसर, प्रशांत नगर,समर्थ नगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील. वीज बंद असणाऱ्या भागातील ग्राहकांना महावितरणकडे पंजीबद्ध असलेल्या मोबाईलवर एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार आहे.