चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर मधील स्थानिक पठानपुरा वॉर्ड मधील कृष्ण बन अपार्टमेंट जवळ महावितरण द्वारा ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 11 किव्हो वीज वाहिनीवरच मोठ्ठे झाड कोसळल्याने समाधी वॉर्ड व आस पासचा परिसर विजेशिवाय अंधारात गेला आहे.झाड कोसळल्याने 11 किव्हो चे सहा खांब, सहा लघुदाब खांब वाकले तसेच दोन्ही रोहित्रांना नुकसान पोहेचले आहे. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरण द्वारा सात रोहित्रे विलग करण्यात आली असून. त्यावरून होणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नुकसानीमुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाचे स्वरूप बघता 24 ते 30 तास किंवा अधिक कालावधी लागू शकतो.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांत चांगलाच रोष आहे.रक्षाबंधनासाठी प्रत्येक घरी पाहुणे आले असताना संपूर्ण सण अंधारात साजरा करावा लागत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांत चांगलाच रोष आहे.रक्षाबंधनासाठी प्रत्येक घरी पाहुणे आले असताना संपूर्ण सण अंधारात साजरा करावा लागत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
स्थानिक दादमहाल वॉर्ड, समाधी वॉर्ड, किसान वसाहत इत्यादी परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सध्या परिस्थितीत 1400 ग्रहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. महावितरण सरवोतपरी प्रयत्न करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या टीम कामात जुंपली असल्याचे महावितरणच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन महावितरण द्वारा करण्यात येत आहे.