14 महिण्यात 4 कोटी 50 लाखांच्या वीजचोऱ्या उघडकिस
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळा अंतर्गत एप्रिल 2017 ते 30 जून 2018 दरम्यान वीजचोरीविरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली मंडलात एकंदरीत 1947 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या विजचोरांनी एकंदरीत 4 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे. यात 598 वीजचेार हे आकडे बहाद्र तर 1349 वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर सोबत छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निश्पन्न झाले. 65 वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्व वीजचोरांनी एकंदरीत 43 लाख 88 हजार 817 युनिटस वीजचोरी केली.
वरोरा विभागात 22 आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व 113 वीजमीटर सोबत छेडछाड करणारे, बल्लारशाह विभागात 49 आकडा टाकूण वीज चोरणारे व 264 वीजमीटर सोबत छेडछाड करणारे, गडचिरोली विभागात 176 आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व 140 वीजमीटर सोबत छेडछाड करणारे, ब्रम्हपुरी विभागात 259 आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व 168 छेडछाड करणारे तर आलापल्ली विभागात 67 आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व 160 वीजमीटर सोबत छेडछाड करणारे व चंद्रपूर विभागात 25 आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व 504 वीजमीटर सोबत छेडछाड करणारे असे एकंदरीत 1947 वीजचेार या कारवाईत सापडले. या सर्व वीज चोरट्यान विरूध्द, वीजकायदा 2003 च्या कलम 135 व 138 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वीजेच्या मीटर्समध्ये छेडछाड करण्यात आलेल्या वीजचोरीच्या प्रकांरामध्ये ,वीजचोरांनी मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकूण मीटर थांबविणे, रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे सर्किट मध्ये फेरफार करणे आदी प्रकार उघडकिस आले आहेत.
अधिक्षक अभियंता तसेच चंद्रपूर, वरोरा, बल्लारशाह , आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंतायांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागीय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्या सोबत पार पाडली. वीजचोरी एक सामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळस्यासारख्या सिमित संसाधनापासून तयार होणारी वीज चोरून चीजचोर देशाच्या संपत्तीवरच घाला घालत असतात. त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांनी केले आहे.