ललित लांजेवार:
वेकोलिने कोळसा खाणीतील शेकडो खासगी सुरक्षा रक्षकांच्या पोटावर वेकोली प्रशासनाने लाथ मारल्याची बाब पुढे आली आहे, चंद्रपूर वेकोली अंतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल २३२ खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेकोली प्रशासनाने कामावरून कमी करून त्या जागी आर्म गार्ड फोर्सचे कर्मचारी तैनात केले आहे. या आधीदेखील जिल्ह्यात वेकोली अंतर्गत येणाऱ्या अनेक कार्यालयात सुरक्षा रक्षक काम करत होते,जुलै २०१७ ला यांना वेकोली प्रशासनाने कामावरून कमी केले होते,त्या नंतर भारतीय मजदूर संघामार्फत यांना कामावर पूर्ववत घेण्यात त्यासाठी ७५ दिवस आंदोलनाचे हत्यार देखील कामगारान मार्फत उपसण्यात आले होते.

वेकोली प्रशासनाने सध्या स्थितित ११४ आर्म गार्ड फोर्सचे जवानांना वेकोलिच्या बारूद ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊच्या ( मैक्जिन ) सुरक्षेसाठी बोलावण्यात आले आहे,मात्र संपूर्ण चंद्रपूर परिसरातील बारूद ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊची सुरक्षा बघितली तरी फक्त २८ सुरक्षा राक्षकांचीच गरज आज या ठिकाणी भासत आहे मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने जादाचा सुरक्षा रक्षक लादून या ठिकाणी बोजा टाकला आहे.
मंगळवारी आर्मगार्डचे ११४ सैनिक चंद्रपुर येथील वेकोली कार्यालयासमोर दिसले.
गेल्या ४० वर्षापासून या बारूद ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊची सुरक्षा शरीराने कमजोर असलेल्या मात्र वेकोलीतच कार्यरत असणार्या कर्मचार्यांच्या भरोवशावर होत होती. मात्र वेकोलीतल्या वारंवार होणाऱ्या चोरींच्या घटनांना पुढे करत या आर्म गार्ड सुरक्षा रक्षक नेमले आहे.व खाजगी सुरक्षा रक्षकांच्या पोटावर लाथ मारली गेली आहे असे काव्यशिल्पशी बोलतांना भारतीय मजदूर संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश बल्लेवार हे म्हणाले. विशेष म्हणजे सध्याच्या स्थिति बारूद घराच्या सुरक्षेसाठी वेकोलिचे सुरक्षा रक्षक आणि काही कर्मचारी ३ पाळीत ५ ते ६ लोक काम करत होते पन आता यांच्या जागी ३ पाळीत तब्बल २० ते २१ आर्म गॉर्डचे जवान काम करणार असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.