पाणी फाऊंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ च्या निमित्याने शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात सत्कार जलरत्नांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या मध्ये ४५ दिवस घाम गळणाऱ्या ६७ गावांनी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले, यात एकून ३६० प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण घेतले,
या स्पर्धेत सातत्याने १५ गावांनी जलसंधारणाची कामे केली,१४ गावाचा उत्तमवकामगिरी केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.यात अधिकारी,कर्मचारी,शिक्षक,भूमीपत्र,पत्रकार,स्वयंसेवक,सामाजिक संस्था,ग्रुप,कॉलेज, उत्तम कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शर्मा साहेब, तहसीलदार सचिन कुमावत,गट विकास अधिकारी मा नादगवळी,वन परिक्षत्र अधिकारी कारंजा राऊत,वन परिक्षत्र अधिकारी तळेगाव टाले साहेब,मंडळ अधिकारी कृषी खोब्रागडे,समाजकल्याण सभापती नीता गाजम प.स.उपसभापती टिपले मॅडम हे सर्व अधिकारी व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.