সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, August 16, 2018

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर उमटल्या प्रतिक्रिया

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं. वयाच्या 93 व्यावर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी देशभरात वा-यासारखी पसरली असून राजकीय अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मान्यवरांच्या आलेल्या विविध प्रतिक्रिया..... 

कुशल राजनेता व राष्ट्रभक्त महान योद्धयास देश मुकला 
- केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर
अहिर के लिए इमेज परिणाम महान दार्शनिक तथा अष्टपैलू व अजातशत्राू व्यक्तीत्व पूर्व प्रधानमंत्राी भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे देशाने कुशल राजनितीज्ञ, तत्वचिंतक व समरसतेचा अविरत मुलमंत्रा जपणारा मातृहृदयी नेता गमावला असून अटलजींच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असल्याची शोक संवेदना केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे. 
लोकसभेत प्रतिनिधीत्व करतांना अटलजींचा नेहमीच सहवास लाभला, ओजस्वी वाणी व संसदेतील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, राष्ट्रहिताची धोरणे, अफाट निर्णयक्षमता व राष्ट्रसुरक्षेसाठी त्यांनी केलेले भक्कम कार्य देशवासीयांच्या नेहमीच स्मरणात राहिल, त्यांच्या निस्पृह, निव्र्याज व राष्ट्रसमर्पित कार्याची महती राष्ट्रासाठी अभिमानास्पद होती. त्यांच्या राष्ट्रभक्तीला सर्व समावेशक वृत्तीला जवळून बघण्याचे सौभाग्य लाभले हे जीवन सार्थकी झाल्याचा माझ्यासाठी अमुल्य क्षण होता अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त करून या महान राजकीय योद्धयाच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो अशी शोकात्म प्रतिक्रीया वाजपेयींच्या निधनाबद्दल ना. अहीर यांनी व्यक्त केली आहे.

अटलबिहारी वाजपेयी...केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, 
तर ते नाव आहे एका महासागराचे...
नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल...
ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी,कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे.
आमचे थोरनेते, राष्ट्रपुरूष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो,त्या आदर्शांपैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते,याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आज माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत आहेत. स्व. प्रमोदजी महाजन यांच्यासमवेत त्यांची झालेली पहिली भेट, त्यानंतर पुढे त्यांचे सातत्याने होत राहिलेले मार्गदर्शन आणि अगदी अलिकडे त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट, हा सारा स्वप्नवत प्रवास. श्रद्धेय अटलजींच्या अशा अचानक निघून जाण्याने कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तन, मन, धनाने राष्ट्रासाठी अगदी सर्वस्व झोकून देणारे आपल्या सर्वांचेच श्रद्धेय अटलजी हे लाडके नेते. संसद असो की एखादी जाहीर सभा, श्रद्धेय अटलजींना ऐकण्यासारखा दुसरा ज्ञानानंद नाही. ज्ञानाचा महासागर, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी, त्यागाच्या तपस्वी मूर्तीचे जाणे अतिशय वेदनादायी आहे. कधीही न भरून निघणारी ही हानी आहे.
श्रद्धेय अटलजी त्यांच्या विचार, मार्गदर्शनाच्या रूपाने आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहतील. केवळ गतकाळातील नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचेही ते मार्गदर्शक असतील. या राष्ट्रऋषीला माझे कोटी कोटी वंदन. या दु:खातून बाहेर पडणे किंवा त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे!
श्रद्धेय अटलजी हे केवळ भाजपाचे नाही, तर या देशाचे सर्वोच्च नेते होते. ज्या मोजक्या नेत्यांना जगभर आदर-सन्मान प्राप्त झाला, त्यातील अटलजी एक. विश्वमान्यतेच्या अटलजींचे नेतृत्त्व सर्व राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सर्वमान्य होते.
एक विशाल हृदयाचा, मोठ्या मनाचा नेता सदैव आपल्यासोबत असावा, अशीच आम्हा सर्वांची इच्छा. पण, नियती कधीच कुणाचे ऐकत नाही. आज जेव्हा भारताच्या परमवैभवाचा प्रवास अतिशय गतीने सुरू आहे, त्या काळात या परमवैभवाच्या प्रवासाचा पाया ज्यांनी रचला ते आपल्यात असते तर त्यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण राहिला नसता.
पण, नियतीला ते मान्य नाही.
अटलजी एका कवितेत म्हणतात,
ठन गई।
मौत से ठन गई।
मै जी भर जिया, मै मन से मरूँ
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?
अटलजी आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावेच लागेल. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, अटलजींवर ज्यांनी नि:स्सिम प्रेम केले, ते या देशातील तमाम नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. एकमेकांना धीर देण्याच्या पलिकडे आपल्या हातात तरी काय आहे?
अटल, अढळ, अचल असलेले हे नेतृत्त्व नित्य आपल्यासोबत राहील, विचारांच्या रूपाने, दिशादर्शकाच्या रूपाने, मार्गदर्शकाच्या रूपाने...
माझी भावपूर्ण श्रद्धांजली...
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपले – ना.सुधीर मुनगंटीवार
अटलजींचे आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा 
भारतरत्‍न श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाने देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. आज एक युगपुरूष काळाच्‍या पडद्याआड गेला असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

           1989 च्‍या लोकसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्‍यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवार होतो. अटलजींनी त्‍यावेळी आपल्‍या भाषणात म्‍हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा आहे. माझ्या समाजिक आणि राजकीय प्रवासात त्‍यांचे हे कौतुकोदगार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले. एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे. 
तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात , समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला पण तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले आहे.
राजकारणातील अजातशत्रू हरपला 
नंदा जिचकार के लिए इमेज परिणाम
भारतीय राजकारणातील भीष्म पितामह, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांवरील पितृछत्र हरविले. ते अजातशत्रू होते. ते केवळ भारतीयांचेच नव्हे तर जागतिक कीर्तिचे नेते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणारी नाही.नागपूर शहरवासियांच्यावतीने व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने या महान आत्म्यास विनम्र श्रद्धांजली.
   
 श्रीमती नंदा जिचकार

महापौर, नागपूर शहर
देशातील राजकारणातील  अजातशत्रु नेता हरपला 
नाना शामकुळे के लिए इमेज परिणाम
अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतीक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे, राजकारणात मला यांच्या भाषण नेहमी भावले. मी नेहमी त्यांचे भाषण ऐकत होतो. त्यांच्या भाषणामुळे नेहमी मला काम करण्याची स्पुर्ती मिळायची. अटलजी आपल्यात नाही हे कल्पनेपलीकडे आहे. त्यांचे आपल्यातून जाणे हे भारतीय राजकारणातील मोठी पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांचे दुःखद निधन मनाला चटका देणारा आहे.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       - आमदार नानाजी शामकुळे
                                                                                                                                                                             राजकारणातील तपस्वी व्यक्तिमत्व गमावले: शिक्षणमंत्री विनोद तावडे 
आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी प्रधानमंत्री, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर स्वत:चा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमाविले असल्याची प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख कायम राहील. नैतिक मूल्यांवर अढळ श्रद्धा असणारे राजकारणी, प्रखर देशभक्त अशी ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्वाने अमीट ठसा उमटवला. काव्यशास्त्रविनोदात रमणारे कवी मनाचे राजकारणी अशीही त्यांची एक ओळख कधीही न विसरता येणारी आहे. भविष्याचा वेध घेणारे त्यांचे सर्वसमावेशक विचार, मार्गदर्शन, नेतृत्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरणादायी, आश्वासक आणि समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही श्री. तावडे यांनी शोकसंदेशात व्यक्त केला.
अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले - राज्यपाल
भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दिल्लीला रवाना होत आहेत. 
"स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते. ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक महासत्ता म्हणून आपला न्याय्य हक्क जगापुढे जोरकसपणे मांडला", असे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले असलेल्या विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे. 
“श्री. वाजपेयी माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. सन १९७५ साली मी करीमनगर (तेलंगणा) जिल्हा जनसंघाचा अध्यक्ष असताना श्री. वाजपेयी यांनी करीमनगर येथे एका महासभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी आणीबाणी लागली व आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेनंतर २३ वर्षांनी मला वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील ‘भीष्म पितामह’गमावले आहे; तर मी माझे लाडके नेते गमावले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तसेच माझ्या स्वतःच्या वतीने मी वाजपेयी यांच्या स्मृतींना आपली आदरांजली वाहतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
(राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या संग्रहातून दिलेल्या सन १९७५ मधील सोबतच्या छायाचित्रामध्ये विद्यासागर राव करीमनगर (तेलंगणा) येथे जाहीर सभेला संबोधित करताना दिसत असून श्री अटल बिहारी वाजपेयी बसलेले दिसत आहेत.)



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.