ललित लांजेवार:
अस्थीविसर्जन कार्यक्रमासाठी गेलेल्या ४ जणांचा नदी प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास समोर आली होती.त्यातील दोन मुलांचा मृत्यू शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शोधपथकास हाती लागले. केतन भोजराज पोटदुखे 20, विक्की शंकर माहुलीकर 27, असे नाव आहे. हे दोघेही अस्थीविसर्जन कार्यक्रमासाठी गेले होते, यातील दोन जणांना वाचवण्यात उपस्थितांना यश आले होते मात्र हे दोन जण प्रवाहाबरोबर वाहून गेले त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अंधार पडल्याने शोध पथकाला गुरुवारी खाली हात परत यावे लागले होते, मात्र शुक्रवारी सकाळी परत शोधकार्य सुरू झाले दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ असलेल्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या वढा तीर्थक्षेत्र येथे चंद्रपुर येथील रहिवासी नितीन गोवर्धन यांची चंद्रभागा शंकर गोवर्धन यांच्या अस्तिविसर्जनासाठी जवळपास २५ ते ३० लोक गेले होते.
यातील बाबुपेठ येथील रहिवासी असलेले केतन भोजराज पोटदुखे 20, विक्की शंकर माहुलीकर 27, उत्तम सातोबा टेकाम 38, नैनेश शाहा 27 एकूण ४ लोक हे अस्तिविसर्जनानंतर आंघोडीला हे नदीपात्रात उतरले होते.हे चौघेही प्रथमतःपाण्यात वाहून गेले. मात्र उत्तम सातोबा टेकाम व नैनेश शाहा यांना उपस्थित लोकांच्या मदतीने वाचविण्यात आले,यांच्या जाण्याने बाबूपेठ परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.