সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, August 05, 2018

मोहब्बत जिंदा राहती है ......

'कभी खुशी कभी गम' ने केली रसिकांची 'आँखे नम'

नागपूर - मानवी जीवनात सुखदुःखाचा लपंडाव आयुष्यभर सुरु असतो .सी- सॉ खेळाप्रमाणे सुखदुःखाचं पारडं आयुष्यभर सतत वरखाली होत असतं. दुःखाच्या अस्तित्वामुळेच सुखाचं महत्व आपल्याला कळतं.मनुष्य जीवनातील सुख ,दुःख ,आनंद, प्रेम ,विरह या मानवी भावनांची संकल्पना असलेला 'कभी ख़ुशी कभी गम'हा कार्यक्रम सुरसप्तकने सादर केला व रसिकांना विविध भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवले. सुरसप्तकच्या अध्यक्ष सुचित्रा कातरकर यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शनिवार दि. ४ऑगस्ट २०१८ रोजी ,संध्याकाळी ६.३० वाजता सायंटीफिक सभागृह , लक्ष्मीनगर, आठरस्ता चाैक, नागपूर येथे झाला.

'ये जीवन है ' 'जिंदगी कैसी है पहेली 'या  गीतांनी स्व किशोरकुमार यांना श्रद्धाजंली देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.' मोहब्बत जिंदा रहती,मोहोब्बत मर नहीं सकती ' हे मोहम्मद रफीजींना श्रद्धाजंली देत मुकुल पांडेनी गायलेले गीत अतिशय भावपूर्ण झाल्याने रसिकांच्या हृदयाला भिडले आणि त्यांचे डोळे पाणावले. अर्थातच या गीताला वन्समोर मिळाला.विजय देशपांडे यांनी 'फिर वही श्याम' हे तलतजींचे गीत तरलतेने सादर केले.'दिल के अरमां 'या डॉ नयना धवड यांच्या गीताने सलमा आगाची आठवण झाली.'ए मैने कसम ली 'या गीताद्वारे गीतकार नीरज यांना श्रद्धांजली देण्यात आली. 'ये हसी वादिया ' 'दिल तेरा दिवाना' 'खुशिया हि खुशिया ' 'तुम आ गये हो ' 'दिल एक मंदिर है' 'बेखुदी मी सनम' रिम झिम के तराने' 'बडे है दिल के काले' 'ए मेरे हमसफर ' 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा ' अशी एकूण २६ लोकप्रिय गीते..प्रा. पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, प्रतिक्षा पट्टलवार, संगीता भगत, रूचा येनुरकर,अर्चना उचके, फाल्गुनी कुर्झेकर ,प्रा.निसर्गराज,, आशिष घाटे,अपूर्व मासोदकर, अरूण ओझरकर, धीरज आटे या गायक कलाकारांनी तयारीने गायलीत . त्यांना, पवन मानवटकर, पंकज यादव,नंदु गोहाणे ,विजय देशपांडे, आशिष घाटे, रवी सातफळे, तुषार विघ्ने ,वेदांश जाधव, अजित जाधव ,सुधीर गोसाई, आर्या देशपांडे या वादकानीं साथसंगत केली.अभ्यासु निवेदक शुभांगी रायलु यांच्या अस्खलित उर्दू मिश्रित हिंदीतील ओघवत्या निवेदनाने कार्यक्रम अधिकच बहारदार झाला. या कार्यक्रमाला नाथे पब्लिकेशन्सचे .प्रा.संजय नाथे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा निसर्गराज यांनी सुत्रसंचालन केले.रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आनंद लुटला..

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.