ललित लांजेवार:
चंद्रपुर शहरातील बल्लारपूर मार्गावर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील हॉस्टेल मध्ये आज सायंकाळच्या सुमारास एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने विद्यार्थी व शैक्षणिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली, प्रथमेश माळी असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी होता. त्याच्या सोबत राहणाऱ्या काही विद्यार्थ्याने बाहेरून रूमचा दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा लगत असलेल्या खिडकीतुन बघितले असता प्रथमेश हा रूममधील पंख्याला गळफास लावून लटकून दिसला.या घटनेची माहिती महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आली.त्यानंतर लगेच रामनगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत शव पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून प्रथमेश ने आत्महत्या कोणत्या कारणावरून केली त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? याचा पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे PSI मनीष दुबे व कांस्टेबल पुरूषोत्तम गीते करीत आहे.