संग्रहित छायाचित्र |
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हयात दारूबंदी घोषित झाल्यापासुन पोलीस विभाग अवैध दारू तस्करांना वेठीस आणण्याकरीता अहोरात्र प्रयत्न करीत आहे. दिनांक 15/07/2018 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत दोन ठिकाणी अवैध दारू तस्करी बाबत कार्यवाही करीत दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण 559 पेटी व 1000 देशी विदेशी दारूच्या निपा किंमत 76,08,670/-रू चा मुद्देमाल जप्त केला होता. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन नागभिड येथे नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता.स्थागुशा पथक त्याची सतत गोपनीय माहिती काढुन त्याचा पाठलाग करीत होते. आज दिनांक 25/08/2018 रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थागुशा पथक पवनी भंडारा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशा पथकाने सापळा रचुन त्यास पवनी जि. भंडारा येथुन अटक केली.श्रीनिवास कोलावार हा स्वतःच्या भट्टीत दारू तयार करीत असुन त्याच्याकडे दारू विक्रीचे दाेन परवाने त्याद्वारे तो भंडारा जिल्हयातुन ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड आणि चिमुर या परिसरात माेठया प्रमाणात अवैध रित्या दारूचा पुरवठा करीत हाेता. यापरिसरातील सदर आराेपी हा मुख्य पुरवठादार आणि चंद्रपुर जिल्हयातील नाेंद गुन्हयातील फरार आराेपी असल्याने पाेलीस पथक याचे सतत मागावर हाेते.
सदर गुन्हयाचा तपास श्री. महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्ग दर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोनिसुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात पोउपनि जितंेद्र वैरागडे, पोहवा संगीडवार, पोशी अविनाश दशमवार, अमजद, संदीप मुळे, मयुर येरमे यांनी पार पाडली. सदर आरोपीस पुढिल तपासाकरीता नागभिड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.