नागपूर/प्रतिनिधी:
केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधिची रक्कम स्टेट बॅकेच्या अधिका-यांना हस्तांतरीत करतांना महावितरणचे कर्मचारी |
केरळ राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणच्या मौदा विभागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचा-यांनी पुढाकार घेत केरळ मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 हजार रुपयांची रक्क्म स्टेट बॅकेच्या मौदा शाखेत हस्तांतरीत केली.
नुकतेच केरळ राज्यात महापुराने थैमान घातले. यात निसर्ग संपन्न केरळ राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. आपत्तीसमयी नेहमी मदतीची भूमिका घेणा-या महावितरणच्या मौदा विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनीही या संकटकाळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत केरळ मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 हजार रुपये गोळा केले. महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही रक्कम एकत्रित करण्यात आलेली ही रक्कम मौदा विभागातील उपव्यवस्थापक (मानव संसाधन) सुहास भोयर यांचेसह चेतन लोंडबैले आणि अश्विनी धानके यांनी स्टेट बॅंके मौदा शाखेच्या व्यवस्थापिका स्नेहा गणवीर यांच्या सुपूर्द केला. या मदतनिधीत विभागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचा-यांनी वैयक्तिकरित्या स्वयंस्फ़ुर्तपणे दिलेल्या राशीचा समावेश आहे.