गडचिरोली सकाळ चे उपसंपादक मिलिंद उमरे यांनी आपल्या शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली.
चालला आमच्याचसाठी तो निखा-यावर
कैद सुटली, बंध तुटले, त्याच्या इशा-यावर
तो जरी गेला तरी आम्हास रक्षिण्या
संविधानी लेखणी त्याची पहा-यावर
शेळी होत जगण्यापरी मरण ते बरे
भीम बोले संकटे येती भिणा-यावर
भीमविचार वाघिणीचे दूध आहे रे
सारी दुनिया भाळते त्याला पिणा-यावर
सागरा हळुवार लाटा येऊ दे अता
भीम माझा निजला आहे किना-यावर
- मिलिंद मधुकरराव उमरे