সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 14, 2017

पाठलाग करून युवतीचा विनयभंग


*आरोपी 12 तासाच्या आत पोलिसांच्या जाळ्यात

बाजारगाव परिसरातील घटना
बाजारगाव :- काल दिनांक १३/१२/२०१७ ला सातनवरी येथील युवती ही बाजारगाव येथे निखिल कालबांडे यांच्या जनरल स्टोर्स मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आली असता सातनवरी गावातून तिचा पाठलाग मंगेश सुरेश बावणे (३९)रा.सातनवरी हा करत होता ती वस्तू खरेदी करून गावाला परत जात असताना आरोपी मंगेश सुरेश बावणे ने सुनिताचा हात पकडला व मी तुझ्यावर प्रेम करतो आपण फिरायला जाऊ असे म्हटले या गोष्टीचा विरोध तीने केला परंतु आरोपी मंगेश ने सुनीताचा हात सोडला नव्हता व तिला  म्हटले की घरी जर सांगितले तर तुला मारील व शिवी गाळ दिली सुनीताने कसे  तरी मंगेश च्या तावडीतून पळ काढून सातनवरी गाव  गाठले व आई वडील शेतातून येत पर्यंत  आपल्याच घरीच चोरासारखी लपून बसली आई वडील घरी आल्यानंतर तीने सर्व हकीकत आई वडिलांना सांगितली घरच्या मंडळी समोर काय करावे असा प्रश्न निर्माण झाला परंतु सुनीताने व तिच्या आईने न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे धाडस केले रात्री ८.५५ ला तिघांनीही कोंढाळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली व लगेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी हा गावात नाही याची माहिती पोलिसांना मिळाली परंतु गुप्त माहितीच्या आधारे कोंढाळी पोलीस ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात बाजारगाव बिट जमदार लोहकरे व शिपाई सुनील वाणी यांनी आज दि.१४/१२/२०१७ सकाळी ८ च्या सुमारास आरोपीस त्याच्या घरून अटक केली
  सदर आरोपी वर भा.द.वी.३६४,५०६,३२३ गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारगाव बिट जमदार लोहकरे व शिपाई  सुनी वाणी हे करत आहे


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.