कोल्हापूर/चंदगड :
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीला उठबशा काढायला लावणारी संबंधित मुख्याध्यापिका अश्विनी देवाण (वय ४५, रा. डुक्करवाडी, ता. चंदगड)हिला अटक करण्यात आली आहे. चंदगड पोलिसांनी दुपारी भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२१, ३३६, ३३७, ५0६ नुसार अश्विनी देवाण हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान याप्रकरणी विधानपरिषदेत या विषयाचे पडसाद उमटले. विधानपरिषदेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे आदेश देताच तातडीने कारवाई करत चंदगड पोलिसांनी दुपारी सव्वा एक वाजता मुख्याध्यापिका अश्विनी देवाण हिला अटक केली. याप्रकरणी देवाण हिच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले असून यात गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, यासारख्या कलमांचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक अशोक पवार करीत आहेत. विजयाची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चंदगड पोलिसांनी आज मुख्याध्यापक अश्विनी देवाणे यांना अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थिनीला इतरांचा आधार घेतल्या शिवाय उठताही येत नाही.