সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 11, 2017

झुंडशाहीच्या राजकारणाविरोधात व्यापक लढाई लढायची आहे


  • अॅड. निशाताई शिऊरकर
  • अंगणवाडी कर्मचारी सभेचा जिल्हा मेळावा 
चिमूर /तालुका प्रतिनिधी
दुर्बल , दुर्लक्षीत व सामान्य मानसांना न्याय मिळवुन देण्याचे स्वप्न बाळगून मानव मुक्तीच्या चळवळीची वाट निवडून संघटना बांधली आहे .केंद्रापासुन राज्यापर्यंत सरकार गरीब विरोधी असुन झुंडशाहीचे राजकारण सुरू आहे . अशा झुंडशाहीच्या राजकारणा विरोधात मोठी व्यापक लढाई लढायाची असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्षाअॅड . निशाताई शिऊरकर यानी हुतात्मा स्मारक चिमुर येथे आयोजीत जिल्हास्तरीय मेळाव्यात केले .
 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व त्याकरीता त्यांच्याशी सुसंवाद साधुन चळवळ आणी आंदोलनाची दिशा ठरविण्या करीता व विधानसभेवर मोर्चाच्या सहभागा करीता अंगणवाडी कर्मचारी सभेच्या चंद्रपुर जिल्हा स्तरीय मेळाव्याचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात आले .मेळाळ्याच्या अध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्याध्यक्ष अॅड .निशाताई शिऊरकर , प्रमूख मार्गदर्शक महासचिव कमलताई परूळेकर , कामगार नेते रूपचंद गद्रे , जयश्री काळे , चंद्रशेखर शुक्ला , किशणाताई भानारकर आणी जिल्हाध्यक्ष इमरान कुरेशी हे विचारमंचावर उपस्थीत होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलताई बारसागडे यांनी केले .
मेळाव्याला मार्गदर्शन करताना अॅड .निशाताई म्हणाल्या की अश्रूचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा  मोठे असते . त्यामुळे राज्य कार्याध्यक्ष दिवंगत इखलाख भाई कुरेशी यांनी या चळवळी करीता दिलेल्या अमुल्य योगदाना बद्दल विधानभवणावर आयोजीत मोर्चा हा इखलाखभाईच्या सार्वजनिक जिवनाला मोर्चा समर्पित आहे .मेळाव्याला उपस्थीत मान्यवरांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करीत दिवंगत राज्य कार्याध्यक्ष इखलाखभाई कुरेशी यांचा वारसा विश्वासाने त्यांचे चिरंजिव इमराण कुरेशी यांचे कडे देण्याचे ठरविण्यात आले . मेळाव्याचे संचालण माधुरी विर तर आभार प्रदर्शन आशाताई निमसटकर यांनी केले . मेळाव्याला चिमूर , नागभीड , भद्रावती , वरोरा , ब्रम्हपुरी , मुल , सिंदेवाही , या तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकारी आणी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थीत होत्या .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.