সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

महापारेषणतर्फे आरोग्य शिबीर

नागपूर/प्रतिनिधी: 
१३२ के.व्ही बेसा उपकेंद्र महापारेषण नागपूर आणि व्होकार्ड हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'मोफत हृदय रोग तपासणी शिबीर’ सोमवारी बेसा उपकेंद्रात आयोजित करण्यात आला होता.या शिबिरात अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या परिवारातील एकूण ८० रुग्णांनी लाभ घेतला.

ऊर्जाविभागात काम करतांना तेथील कर्मचाऱ्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते ,अनेक मानसिक दडपणदेखील असते,त्यासाठी महापारेषांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत हृदय रोगांसोबत विविध रोगांवर उपचार व निदान होईल या अनुशंघाने या शिबिराचे आयोजन केले होते . या शिबिरात व्होकार्ड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ८० रुग्णांची विविध उपकरणांच्या सहाय्याने तपासणी केली. यात रक्तदाब,मधुमेह,यासारख्या अनेक रोगांवर डॉक्टरांकडून    निदान देखील करण्यात आले.

या शिबिरात नागपूर ग्रहण विभागाचे कार्यकारी अभियंता अमलेश लोणारे, उपकेंद्र प्रमुख,उपकार्यकारी अभियंता आश्विन भगत, आर.एस रिंगमेन  डिव्हिजन नागपूर तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तसेच व्होकार्ड हॉस्पिटलकडून  मार्गदर्शक श्री मनीष मोहातकर,डॉ.प्रफुल आवळे, व यांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली, संपूर्ण शिबिराला यशस्वी बनविण्यासाठी १३२ के.व्ही बेसा उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.