সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 22, 2017

कार्पोरेट जगतामधील वास्तवावर भाष्य करणारे ‘चाहुल’


चंद्रपूर- कलारसिक यवतमाळ या संस्थेने मंगळवारी प्रशांत दळवी लिखीत ‘चाहुल’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. दोन पात्रांनी अभिनय करत प्रवास करणा-या चाहुलने प्रेक्शकांच्या मनाचा अपेक्षीत वेध घेतला नाही हे मात्र खरेकार्पोरेट जगतामध्ये प्रमोशनसाठी कोणत्याही पातळीवर तडजोड करत स्पर्धेला सामोरे जाण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती प्रशांत दळवी यांना लेखनातुन प्रभावीपणे मांडली आहे. मकरंद आणि माधवी ही पात्रे मात्र या दोन पात्रांचा मानसिक संघर्श दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न सतिश पवार यांनी केला. नेपथ्य, संगीत व प्रकाशयोजना यांच्या माध्यमातुन अनेक प्रसंग दिग्दर्शनाला उठावदार करता आले असते मात्र या बाजु अतिशय सुमार होत्यामकरंदच्या  भूमिकेत सतिश पवार तर माधवीच्या भूमिकेत शितल राऊत हे कलावंत होते. सतिश पवार अभिनयात कमी पडले तर शीतल राऊत यांना भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि बहुतांशी तो त्यांनी चांगल्या प्रकारे निभवीला नाटकाची काठिण्यपातळी अतिशय जास्त असल्याने नव्या कलाकरांना ते स्वतःला पूर्ण झोकून लागले . ‘चाहूल’ सारखी यशवंत संहिता हाताळताना दिग्दर्शकाची झालेली दमछाक क्षणोक्षणी दिसत होती. शीतल राऊत यांच्याकडे चांगला अनुभव असल्याने त्यांनी आपल्या पात्राला अतिशय चांगले प्रेक्षकांसमोर मांडले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.