पारशिवणी : पंचायत समिती अंतरंगत वराडा केंद्रातील
शाळांचा केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च
प्राथमिक
शाळा गोंडेगाव येथे पार पडला यामध्ये वराडा
केंद्रातील ११ शाळांनि सहभाग घेतला वरिष्ट गटांमध्ये गोंडेगाव व कांद्री
शाळेच्या खेळाडूंनी विजय मिळविला तर कनिष्ठ गटांमध्ये बखारी व येसंबा
खेळाडूंनि विजय मिळविला संस्कृतिक कार्यक्रमामध्ये वराडा शाळेच्या
खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला या प्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून
साटक जिल्हा परिषद सदस्य कल्पना चहांदे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून
गोंडेगाव ग्राम पंचायत सरपंच नितेश राऊत तर प्रमुख पाहुणे उपसरपंच विनोद
सोमकुंवर,कन्हान नगर परिषदेचे नगराध्यक्ष शँकर चहांदे,शाळा व्यवस्थापन
समिती अध्यक्ष रामदास वाघाडे,ग्राम पंचायत समस्त सदस्य,तसेच शाळा
व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक
रेखा अगस्ती केंद्र प्रमुख वराडा यांनी केले.संचालन वामन पाहुणे यांनी तर
आभार प्रकाश रंगारी यांनी मानले,कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुभाष
महादूले,रमेश पाटील,देविदास दामेधर,गुलचंद मोहने,प्रेमचंद राठोड,रेखा
पिपरेवार,भावना काळाने,मीना भीमटे,छाया मुसळे,दीपा शेंडे,मेश्राम
मॅडम,बेलसरे,
नागपुरे,चंदनखेडे,काकडे,मडावी, कांडलकर सलामें,दांडेकर यांनी सहकार्य केले