सिंदेवाही- तालुकास्तरीय KRA मुख्याध्यापक कार्यशाळा पंचायत समिती, सिंदेवाही -( बीट :- सिंदेवाही, गुंजेवाही अंतर्गत भारत विद्यालय , पळसगाव (जाट) येथे घेण्यात आली.
यावेळी बाबूपेठ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणचे प्राचार्य धनंजय चापले यांनी मार्गदर्शन केले.
KRA बाबत मुख्याध्यापकामध्ये मार्गदर्शन व चर्चा, NAS सर्वेक्षण बाबत विशेष मार्गदर्शन व महत्व विषद केले, ASER सर्वेक्षण बाबत आपल्या जिल्ह्याचे स्थान व आपली प्रगती कुठे आहे, यावरही मार्गदर्शन केले. गणितपेटीतील साहित्याची ओळख व घटकनिहाय वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.दि. 14 जुलै 2017 च्या जीआर चे वाचन सर्व मुख्याध्यापकांनी करून त्यानुसारच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी-1 घेऊन गुणदान करावे, असे सूचित करण्यात आले.
कार्यशाळेत शिविअ केंद्रप्रमुख व सर्व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
कार्यशाळेत मान. श्री. मेश्राम ( B.E.O. ), श्री. चहांदे, श्री. परचाके, बरगडे ( के. प्र. ) श्री. बोरकर मु.अ. भारत विद्यालय , पळसगाव श्री. भारत मेश्राम, श्री. बगडे, श्री. निकुरे, विषयतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन श्री. शेंडे ( के.प्र.) यांनी केले, तर आभार श्री. जनबंधू यांनी मानले.
Saturday, November 25, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য