সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 25, 2017

राष्ट्रवादीकाँग्रेसला सोडचिठ्ठी; तालुकाध्यक्षांचा शिवसेनेत गृहप्रवेश

पारशिवनी,  : तालुक्यातिल चांपा (बोर्डा) गावातिल शेतकऱ्यांन तर्फे माजी आमदार आशिष जैस्वाल यांचा रब्बी पिकांना पेंच प्रकल्पातून पाणी सोडन्या साठी शाशन व प्रशाषणा सोबत कायद्याने लढा देत शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्या बाबद सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे,उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलाश खंडार यांच्या कडून आयोजित कार्यक्रमात खंडार यांच्या सह शेकडो कार्यकर्ता व पदाधिकार्यांनि शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली.

शक्यतो फरवरी मार्च मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे तालुक्यात वाहायला सुरवात झाली असून पक्षांच्या पुढाऱ्यांचे मतभेदांमुळे पक्षीय नेत्यांची पक्षांतर करण्याला सुरवात झाली असल्याचे चित्र २४ नोव्हेंबर ला चांपा येथे माजी आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाले.खंडार हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद साटक-गोंडेगाव साठी जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले होते.परंतु पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व खंडार यांच्यात आगामी जिल्हा परिषद उमेदवारी वरून दोघात अंतर्गत कलह उफाडुन आल्याची चर्चा तहसील तसेच राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत सुद्धा सुरू होती.अशातच खंडार यांनी पक्षीय कलह कायमस्वरूपी संपविन्यासाठी रब्बी पिकाला पाणी मिडवून देण्याच्या विषयाला धरून माजी आमदार आशिष जैस्वाल यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करीत त्याच कार्यक्रमात खंडार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान शहर अध्यक्ष नेवालाल सहारे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विघे,युवक तालुका अध्यक्ष नरेश भोंदे,किंग कोब्रा युथ फोर्स चे तालुका संपर्क प्रमुख अनिल गजभिये,केरडी सरपंच प्रकाश पडोळे, उपसरपंच लक्ष्मण खंडाळ, बनपुरी उपसरपंच राकेश उपासे, सदस्य मारोती वानखेडे, धनराज खंडाळ ,प्रकाश काठोके, गजानन हिवसे, सह शेकडो कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेष घेतला.

ज्यामुळे गोंडेगाव जिल्हा परिषद अंतर्गत शिवसेनेची ताकत वाढली परंतु शिवसेनेतून आगामी निवडणुकीत आपली दावेदार ठेवणार्या शिवसेनेतील पक्षनिष्ठ कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या इच्छा आकांक्षांची हिरमोळ होण्याची शक्यता खंडार यांच्या शेकडो कार्यकर्त्यां सह शिवसेनेत आगमनाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार कृपाल तुमाने हे होते. सत्कारमूर्ति माजी आमदार आशीष जैसवाल,जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर,उप जिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे,पंचायत समिती उपसभापति जिवलंग पाटील,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नरेश राऊत,तालुका अध्यक्ष राजू भोस्कर यांची उपस्थिती होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.