नागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२)
यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींचा
अद्याप छडा लागलेला नाही. दुसरीकडे अपहरण केल्यानंतर आरोपींनी राहुलला
बुटीबोरी जवळच्या रामा डॅमजवळ नेले आणि त्याला मारहाण करून जिवंतपणीच
पेटवून दिले,अशी थरारक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे
उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, समाजमन सून्न झाले आहे. लकडगंज
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे.
नागपूर-विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक म्हणून आग्रेकर ओळखले जातात.
सुरेश आग्रेकर यांना राहुल तसेच जयेश नामक मुले आहेत. मंगळवारी सकाळी राहुल
घराबाहेर पडला. काही अंतरावरच आरोपी दुर्गेश आपल्या साथीदारांसह बोलेरोत
बसून होता. त्याने राहुलला बोलेरोत बसवून घेतले. सकाळचे ११.३० झाले तरी
राहुल घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी फोन केला. यावेळी
त्यांनी दीडएक तासात येतो, असे तो म्हणाला. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी
जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर राहुलच्या क्रमांकावर फोन आला. फोन करणाराने
आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर
एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. दुसरीकडे अपहरण आणि
खंडणीची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम
होतील, अशी धमकीही आरोपींनी दिली. आग्रेकर कुटुंबीयांनी दुपारी ४ च्या
सुमारास लकडगंज पोलीस ठाण्यात या संबंधाने माहिती दिली. पोलीस राहुल आणि
अपहरणकर्त्यांचा शोध घेत असतानाच बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक
जळालेला मृतदेह नागरिकांना दिसला. त्यानुसार, बुटीबोरी पोलीस तेथे पोहचले.
राहुल आग्रेकरचे अपहरण झाल्याची माहिती असल्याने बुटीबोरी पोलिसांनी या
मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना कळविली. त्यानंतर लकडगंज पोलीस तेथे
पोहचले. मृतदेहाजवळ चावीचा गुच्छा आणि अन्य चिजवस्तू आढळल्याने तसेच
घटनेच्या वेळी आरोपींचे मोबाईल लोकेशनही तिकडेच दिसत असल्याने तो मृतदेह
राहुलचाच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. तशी माहिती लकडगंज पोलिसांकडून
राहुलच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, चेहरा ओळखू येत नसल्याने
आग्रेकर कुटुंबीयांनी तो मृतदेह राहुलचा नसल्याचे सांगून तो ताब्यात
घेण्यास नकार दिला. त्यावरून या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
उदयनराजे भोसले यांच्या नावाने आमिर खानची फसवणूक
-
मुंबई: आतापर्यंत मोठमोठ्या सेलिब्रेटींची विविध पद्धतीने फसवणूक झाल्याच्या
अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा खान आमिर खानचीही फसवणूक केली
जात असल्...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...