সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 26, 2017

बल्‍लारपूर शहरात होणार रूग्‍णांवर उपचार व शस्‍त्रक्रिया

वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मोफत उपचार व शस्‍त्रक्रियेसाठी
लाइफ लाईन एक्‍सप्रेस हा अभिनव  उपक्रम


बल्‍लारपूर -  वित्‍तमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने महाराष्‍ट्र शासन आणि भारतीय रेल्‍वे या संयुक्‍त विद्यमाने लाइफ लाईन एक्‍सप्रेस हा आरोग्‍य विषयक उपक्रम चंद्रपूर जिल्‍हयात प्रथमच राबविण्‍यात येत आहे. दिनांक 27 नोव्‍हेंबर 2017 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपूर शहरात सकाळी 11 वा. या उपक्रमाचा शुभारंभ वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे.

या लाइफ लाईन एक्‍सप्रेसमध्‍ये नेत्रांशी संबंधित उपचार व शस्‍त्रक्रिया, कानांशी संबंधित आजार व उपचार, फाटलेले ओठ, कर्करोग निदान तसेच स्‍तन आणि गर्भाशयाच्‍या कर्करोगाचे परिक्षण, परिवार नियोजन व आरोग्‍य सेवा स्‍थायी व अस्‍थायी उपायांची माहिती, मिरगी तसेच दंत चिकीत्‍सा आणि त्‍यासंबंधीचे उपचार याबाबत नागरिकांना उपचार करता येणार आहे. डोळयांशी संबंधित उपचार व शस्‍त्रक्रियेसाठी दिनांक 30 नोव्‍हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत रूग्‍णांची अंतिम निवड सकाळी 9 ते सायं. 5 वा. दरम्‍यान बचतभवन बल्‍लारपूर येथे करण्‍यात येणार असुन 1 ते 8 डिसेंबर दरम्‍यान बल्‍लारपूर येथेच शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. कानांशी संबंधित आजार व उपचारासाठी रूग्‍णांची अंतिम निवड दिनांक 9 ते 12 डिसेंबर दरम्‍यान सकाळी 9 ते सायं. 5 वा. दरम्‍यान करण्‍यात येणार असुन 10 ते 15 डिसेंबर दरम्‍यान शस्‍त्रक्रिया करण्‍यात येणार आहे. कर्करोगाशी संबंधित चिकीत्‍सा तसेच उपचार दिनांक 1 ते 14 डिसेंबर दरम्‍यान बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍टेशनवर करण्‍यात येणार आहे. परिवार नियोजन व आरोग्‍य सेवा या संबंधी चिकीत्‍सा व उपचार 1 ते 7 डिसेंबर दरम्‍यान बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर करण्‍यात येणार आहे. मिरगी संबंधी चिकीत्‍सा व उपचार 8 आणि 9 डिसेंबर दरम्‍यान बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर करण्‍यात येणार आहे. दंत चिकीत्‍सा व उपचार 11 ते 18 डिसेंबर दरम्‍यान बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर करण्‍यात येणार आहे.

या लाइफ लाईन एक्‍सप्रेसचा लाभ जिल्‍हयातील सर्व रूग्‍णांना घेता येणार असुन निवड झालेल्‍या रूग्‍णाची व त्‍याच्‍या एका सहाय्यकाची निःशुल्‍क जेवण व राहण्‍याची सुविधा करण्‍यात येणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असुन याबाबतच्‍या अधिक माहितीसाठी श्री. निखील निंदेकर (9175351180) व श्री. राजू दासरवार (9158924008) भाजपा कार्यालय बललारपूर तसेच श्री. गिरीश सुळे (8805009381) यांच्‍याशी संपर्क साधावा तसेच आपल्‍या जवळच्‍या सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये याबाबतची अधिक माहिती उपलब्‍ध राहणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ 27 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11.00 वा. बल्‍लारपूर येथे वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणारा असुन याप्रसंगी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री ना. हंसराज अहीर, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्‍लारपूर चे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, उपाध्‍यक्ष सौ. मिना चौधरी आदींची उपस्थिती राहणार आहे. विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून जनतेची सेवा करणा-या ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन राबविण्‍यात येणा-या या उपक्रमाचा लाभ मोठया संख्‍येने जिल्‍हयातील नागरिकांनी घ्‍यावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.