সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 28, 2017

ब्रम्हपुरी येथे कुणबी समाज मेळावा


ब्रम्ह्पुरी /प्रतिनिधी
कुणबी संघटना ब्रम्हपुरी च्या वतीने संविधान दी
दिनानीमीत्त कुणबी समाज प्रबोधन मेळावा विट्ठल रुक्मिणी सभागृह  येथे बहुसंख्य कुनबी बांधवाच्या समक्ष पार पडला.
ऐतिहासिकदृष्ट्या कुणबी हा भारतातील एक पुरातन कृषिवल समुदाय आहे. उत्तर भारतात या समुदायाला प्राय: असामी, रयत असं म्हटलं जातं. ऋग्वेदात याच समुदायाला 'विश' असं म्हटलं जात असे. दक्षिण भारतात याच कृषिवल समुदायाला कुळ, कुणबावा, कुणबी, कणबी, लेवा अशी अनेक प्रचलित नावं आहेत.मग कुनबी समाजाची आजतागायत झालेली दशा व दिशा यांची अनेक उदाहरणे देवून कुनबी समाजानी काय करावे आणि काय नाही करावे की आपाल समाज एकत्रित होउन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन नतमस्तक होणार त्या साठी कुनबी समाजामध्ये एकोपा आवश्यक असे रोखठोक वक्तव्य करतानी मार्गदर्शक  मा.श्री.दिलीपजी चौधरी यानी कुणबी समाजाला मार्गदर्शनातून व्यक्त केला.
तसेच कुनबी समाजाच्या विकासाकरीता सदैव कार्याशील  राहणारे नेहमी कुणबी समाजातील बांधवांना एकत्रित आणण्याकरीता झटनारे जी.प.उपाध्यक्ष चंद्रपूर मा.श्री. क्रिष्णलाल सहारे यानी मार्गदर्शन करताना कुनबी समाजाला प्रबोधन करत असताना कुणबी-ही महाराष्ट्रातील तुलनात्मकरीत्या सर्वात मोठी जात आहे. कुणबी समाज इतिहास पुरुष असून, महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक पुनर्रचनेच्या समता आंदोलनाचा अग्रदूत, स्वातंत्र्य आंदोलनाचा कणा, अर्थ उद्योगाचा/सहकाराचा अग्रणी आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचा राजकीय सत्तेचा शक्ती स्रोत आहे. वर्तमान काळात  आता कुणबि संघटनेच्या  माध्यमातून हा समाज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. न्याय्य मागणी म्हणून एका विशिष्ट अजेंड्याखाली शहरोशहरी कुनबी समाज बांधणीच कार्य चालू आहेत असे वक्तव्य जी.प.उपाध्यक्ष श्री.सहारे साहेब यानी सांगितले आहे.
संकटाना सामोरे गेल्याशिवाय बदल घडू शकत नाही.
समाजात प्रबोधन करताना अनेक अडचणी येतात त्यावर मात करायला तरुणांनी शिकले पाहिजे, समाज सेवा आणि समाज परिवर्तन ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. बदल समाज सेवा करून होणार नाही तर तो वैचारिक प्रबोधन केल्यानेच होणार आहे आणि त्यासाठी शिकलेल्या तरुणांनी पुढाकार घ्यावा..आम्ही हि चळवळ उभारली आहे ती जोमाने पुढे चालावी यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे मत जी.प.सदस्य चंद्रपूर मा.श्री. प्रमोदभाऊ चिमुरकर यानी मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
या मेळाव्याला अन्य मान्यवरानी कुनबी समाजावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या मेळाव्याच संचालन प्राध्यापक श्री.शिंगारे यानी केले ,प्रास्थाविक दोनोडे सर ,आभार मोंटू पिलारे यानी केले.अशा सुस्थितीत कुनबी समाज मेळावा संपन्न झाला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.