সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 23, 2017

महाराष्ट्र राज्य संस्कृत शास्त्रा स्पर्धेत नेत्रादीपक कामगिरी

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ

नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या के. जे. सोमया संस्कृत विद्यापीठाद्वारे महाराष्ट्र राज्यस्तरीय शास्त्रा स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये व्याकरणशलाका, वेदान्तशलाका, सांख्ययोगभाषण, धातुरूपकण्ठपाठ, ज्योतिषशलाका, पुराणेतिहासशलाका, साहित्यशलाका, शास्त्राीयस्फूर्ति, वेदभाष्यभाषण, साहित्यभाषण, धर्मशास्त्राभाषण, अष्टाध्यायीकण्ठपाठ, भगवद्गीताकण्ठपाठ इ. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या विकासात प्राचीन शास्त्रापरंपरेचे अन्यन्यसाधारण स्थान आहे. या शास्त्रापरंपरे जतन करण्यासाठी संस्कृत विद्यापीठ कटिबद्ध आहे.शास्त्राअध्ययनासह शास्त्रा कंण्ठस्थीकरण शास्त्राशलाकापरीक्षा, शास्त्राभाषण इ. पारंपारिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्याथ्र्यांना तयार करणे व त्यांना सहभागाची संधी उपलब्ध करुन देणे यासाठी विश्वविद्यालयाचे
प्राध्यापक व विद्यार्थी निरंतर परिश्रम घेतात. याचेच फळ नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य संस्कृत शास्त्रा स्पर्धेच्या निमित्याने समाजापुढे आले.या शास्त्राीय स्पर्धामध्ये विश्वविद्यालयाच्या 09 विद्याथ्र्यांनी सहभाग तर नोंदविलाच पण आपल्या शास्त्राज्ञानाच्या बळावर व प्रतिभाशक्तींच्या जोरावर या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून नेत्रादीपक कामगिरी केली. या विविध स्पर्धांपैकी व्याकरणशलाका मध्ये श्रीवरदा माळगे, वेदान्तशलाका मध्ये परीक्षित झोडेकर, ज्योतिषशलाका स्पर्धेत अनुज शर्मा, धर्मशास्त्रा भाषणमध्ये वैष्णवी दाभेकर, भगवद्गीताकण्ठपाठ मध्ये अद्वैत आर्वीकर, अष्टाध्यायीकण्ठपाठ मध्ये देवेश्वर आर्वीकर, वेदभाष्यभाषण मध्ये रूपेश रुद्रकार या सात विद्याथ्र्यानी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर साहित्यशलाका आणि शास्त्राीयस्फूर्ति या दोन स्पर्धांमध्ये वेदश्री आर्वीकर आणि साहित्यभाषण मध्ये गौरी सोनटक्के हयांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. समारोप समारोहामध्ये सोमय्या विद्यापीठ केंद्राचे प्राचार्य डाॅ. सुदेशकुमार शर्मा व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व
विद्याथ्र्याचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रा देऊन अभिनंदन करण्यात आले. विविध स्पर्धामध्ये विश्वविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी सखोल शास्त्राीय ज्ञानाचे प्रदर्शन अतिशय आत्मविश्वासाने सादर केले. त्याचे जम्मु,जयपूर,दिल्ली,मुंबई इ. स्थानावरून आलेल्या
परीक्षकांनीही कौतुक केले. प्रथम क्रमांक प्राप्त करणारे सर्व विद्यार्थी अगरतला (त्रिपुरा) येथे 18 ते 21 जानेवारी 2018 दरम्यान संपन्न होणा-या राष्ट्रीयस्तरावरील शास्त्राीयस्पर्धेसाठी पात्रा ठरले आहेत. विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू (प्र) डाॅ. प्रमोद येवले यांनी ‘‘शास्त्राजतनात युवापिढीचे योगदान आता काळाची गरज आहे व ते या स्पर्धेतील प्रावीण्याद्वारे विद्याथ्र्यांनी आपल्या
शास्त्रानिष्ठा सिद्ध करून विश्वविद्यालयाला गौरव प्राप्त करून दिला आहे’’ अशा शब्दात विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले व राष्टीªयस्तरावरील स्पर्धेसाठी विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्याकुलसचिव डाॅ. अरविंद जोशी, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांनी विजयी चमूचे अभिनंदन केले आहे. डाॅ. शिवराम भट्ट व डाॅ. कलापिनी अगस्ती यांच्या
मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही चमू या स्पर्धामध्ये सहभागी झाली होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.