সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 28, 2017

महत्वाच्या घडामोडी

  • नागपूर : आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
  • यवतमाळ : पुसद तालुक्यात कवडीपूर तांडा येथे वीज वितरणच्या पथकावर गावक-यांनी सकाळी हल्ला केला. यात सहायक अभियंता जखमी झाले. वीज कर्मचा-यांनी घटनेचा निषेध केला असून याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
  • गडचिरोली : खुनातील आरोपीची नक्षल्यांकडून हत्या, दोन वर्षांपासून होता फरार.
     
  • अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  नराधमास जन्मठेप
    नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या  एका ५५ वर्षीय नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. कुळकर्णी यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


    • नागपूर विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंचाला धक्का
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये मोठे उलटफेर होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. मागील वेळेप्रमाणे यंदादेखील डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशन’चा दबदबा कायम राहिला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.